Solapur News : अखेर मोहोळ येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर, गेल्या अनेक वर्षाची नागरिकांची मागणी पूर्ण

मोहोळ येथे ग्रामीण रुग्णालय आहे, त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत
sub-district hospital at Mohol is approved demand of citizens fulfilled mla yashwant mane
sub-district hospital at Mohol is approved demand of citizens fulfilled mla yashwant manesakal
Updated on

मोहोळ : गेल्या अनेक वर्षापासून मोहोळ तालुक्यातील जनतेची मागणी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयास अखेर मंजुरी मिळाली असून, त्यामुळे शहरासह तालुक्यातील जनतेला आता चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील अशी माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली.

दरम्यान या उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी "खास बाब" म्हणुन विशेष प्रयत्न केले.यासाठी माझ्या एकट्याचे श्रेय नसून माझ्यासह शहरातील सर्व नागरिकांचे, राजकीय नेत्यांचे प्रयत्न कामी आल्याचे आमदार यशवंत माने यांनी आवर्जून सांगितले.

मोहोळ शहराची अपघाती परिसर म्हणून ओळख आहे. राष्ट्रीय महामार्ग, पालखी मार्ग व जिल्हा मार्ग हे तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गेल्याने परिसरात अपघात होतात. सध्या मोहोळ येथे ग्रामीण रुग्णालय आहे, त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवावे लागते. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. रुग्णालयात अनेक सोयी सुविधा नाहीत.

त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामावरही मर्यादा येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रुग्णालयात अनेक महत्त्वाच्या पदांची वणवा आहे. त्यामुळे हे ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळांबा आहे. दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, खा डॉ.जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी रुग्णालयाला भेटीही देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली होती.

मोहोळ चे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी उपजिल्हा रुग्णालयासाठी दोन वेळा आंदोलन ही केले होते. आता उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याचे समजतात नागरिकांत आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान आमदार यशवंत माने यांनी आता क्रीडा संकुल, बस आगार, मोहोळची पाणीपुरवठा योजना ही कामे करावयाची आहेत तीही लवकरच पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान आमदार रमेश कदम हे 2014 साली आमदार झाल्यानंतर त्यांनी उपजिल्हा रुग्णालयासाठी सध्याचे मुख्यमंत्री व त्यावेळचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. मात्र आमदार कदम यांना तब्बल आठ वर्षांनी जामीन मंजूर झाला.

त्यानंतर ते गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने मोहोळ मतदार संघात आल्यानंतर मोहोळ येथील उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याचे पत्र समाज माध्यमावर व्हायरल झाले. त्यामुळे हा योगायोग की आमदार कदम यांचा पायगुण अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

तर सत्कार करू

दरम्यान क्रीडा संकुल, मोहोळचे बस आगार, शहराची पाणीपुरवठा योजना, यासह अनेक महत्त्वाची कामे झाली नाहीत, ती लवकरात लवकर पूर्ण केली तर आपण आमदार यशवंत माने यांचा सत्कार करू असे बारसकर यांनी सांगितले.

उपजिल्हा रुग्णालयासाठी यांनी केले प्रयत्न

  • मोहोळचे तत्कालीन आमदार रमेश कदम

  • प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर

  • शिवसेनेचे नेते सोमेश क्षीरसागर

  • राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील

  • भाजपाचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर

  • भाजपचे नेते संजय क्षीरसागर

  • नगरसेवक सत्यवान देशमुख

  • अॅड. विनोद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com