Success Story: डॉ. विवेक चिट्टे यांची दंतवैद्यक क्षेत्रात नवी क्रांती, महाग ठरणाऱ्या उत्पादनाला हा नवा पर्याय

Solapur| डॉ. विवेक चिट्टे हे ऑर्थोडोन्टीस्ट म्हणून शहरात प्रॅक्टिस करतात, रुग्णाला स्वस्त दराचा नव्या तंत्राचा पर्याय देण्याचे त्यांनी ठरवले.
Success Story: डॉ. विवेक चिट्टे यांची दंतवैद्यक क्षेत्रात नवी क्रांती, महाग ठरणाऱ्या उत्पादनाला हा नवा पर्याय
Updated on

Solapur: येथील ऑर्थोडोन्टीस्ट डॉ. विवेक चिट्टे यांनी वेड्यावाकड्या दातांवर बसवण्यात येणाऱ्या क्लिपला पर्यायी तंत्राचा वापर करून मिस्कअलाईन नावाचे उत्पादन तयार केले आहे. या माध्यमातून त्यांनी रुग्णांना गैरसोयीचे व महागडे ठरणाऱ्या उत्पादनाला नवा संशोधित पर्याय उपलब्ध करून नवी क्रांती घडवली आहे.

डॉ. विवेक चिट्टे हे ऑर्थोडोन्टीस्ट म्हणून शहरात प्रॅक्टिस करतात. वेडवाकडे दातांवर क्लीप बसवण्याचे उपचार सर्वसामान्यपणे केले जातात. त्यानंतर एका अमेरिकन कंपनीने या क्लीपला पर्याय देणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले. पण हे तंत्रज्ञान अत्यंत महागडे आहे. सर्व सामान्य भारतीय रुग्णाला ही बाब परवडणारी नाही. रुग्णाला स्वस्त दराचा नव्या तंत्राचा पर्याय देण्याचे त्यांनी ठरवले.

त्यांनी स्वतः या नव्या तंत्राचा उपयोग करण्यासाठी तैवान, चेन्नई व हैदराबाद येथे प्रशिक्षणे पूर्ण केली. तेव्हा दाताच्या क्लीपला स्वस्तात उपलब्ध होणारा पारदर्शक प्लॅस्टिकचा वापर करून विशिष्ट प्लॅस्टिक शीट वापरता येतील हे त्यांनी समजून घेतले. त्यानंतर त्यांनी जर्मनीतून साहित्य आयात करून उत्पादनाची निर्मिती केली. स्वतः या तंत्राद्वारे रुग्णावर उपचार सुरु केले. हे उपचार अत्यंत यशस्वी ठरले.

तेव्हा त्यांनी या उपचारासाठी काम करणाऱ्या ऑर्थोडोन्टिस्ट तज्ज्ञांना उत्पादने उपलब्ध केले. त्यांनी मिस्कअलाईन नावाने हे उत्पादन बाजारात आणले. त्यांनी हे उत्पादन उपचार करणाऱ्या तज्ज्ञांना दिल्यानंतर त्याचे चांगले परिणाम मिळाले.

ठळक बाबी

- वेड्यावाकड्या दातांवर क्लिपच्या उपचाराला पर्याय

- नव्या तंत्राचा वापर

- तज्ञ डॉक्टरांसाठी उत्पादनाची निर्मिती

- रुग्णांच्या खर्चात निम्म्या रकमेची बचत

- क्लीप उपचाराप्रमाणे पुन्हा पुन्हा तपासणीची गरज नाही

स्टार्टअपमधून विकसित केलेली

मूल्ये

- उपचारासाठी लागणारा जादा खर्च या समस्येवर संशोधन

- नव्या तंत्रासोबत उत्पादनांची निर्मिती

- रुग्णांचे पूर्वीचे क्लिप उपचारातील दोष संपवले

- उपचार खर्च निम्म्याने झाला कमी

- तज्ञांच्या माध्यमातून उत्पादनाचा उपचारासाठी वापर

- दंत वैद्यक क्षेत्रात नवी क्रांती

सध्या आम्ही उत्पादन गरजेनुसार तज्ञ डॉक्टरांना उपलब्ध केले आहे. आता अधिक विस्तारित प्रमाणात हे उत्पादन बाजारात आणण्याचे काम सुरु आहे.

- डॉ. विवेक चिट्टे, ऑर्थो डोन्टीस्ट, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.