वडिलांच्या राज्यमंत्रिपदाचा डामडौल न करता निर्माण केली स्वत:ची ओळख!

वडिलांच्या राज्यमंत्रिपदाचा डामडौल न करता निर्माण केली स्वत:ची वेगळी ओळख!
तृप्ती कोलते-पाटील
तृप्ती कोलते-पाटीलesakal
Updated on
Summary

अपघाताने स्पर्धा परीक्षेकडे वळलेल्या व पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवेच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या तहसीलदार तृप्ती उमेश कोलते-पाटील यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : वडिलांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा, तरीदेखील त्या पदाचा कोणताही डामडौल करायचा नाही. स्वतःचे कर्तृत्व स्वतः निर्माण करा, अशी वडिलांची सक्त सूचना. त्यामुळे उत्कृष्ट पत्रकार, वकील (Lawyer) होण्यासाठी धडपड करत असताना, अपघाताने स्पर्धा परीक्षेकडे (Competitive Exam) वळलेल्या व पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवेच्या (State Service Examination) परीक्षेत यशस्वी झालेल्या तहसीलदार तृप्ती उमेश कोलते-पाटील (Trupti Kolte-Patil) यांची ही प्रेरणादायी यशोगाथा (Success Story).

तृप्ती कोलते-पाटील
'FACT' करणार पदवीधर व टेक्‍निशियन अप्रेंटिस पदांची भरती!

पुणे (Pune) जिल्ह्यातील सासवड हे तृप्ती यांचे मूळ गाव, तर सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील नरखेड (ता.मो होळ) हे सासर. प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून सासवडमधील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झाले. शाळेतील प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सहभाग तर होताच, मात्र त्याहून अधिक वेळ मैदानावर जात असायचा. शालेय क्रीडा स्पर्धत अव्वलस्थानी कायम होत्या. शालेय जीवनात त्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक ट्रॉफी व प्रशस्तिपत्रकं मिळाली आहेत. आई गृहिणी तर वडील विजय कोलते हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते अन्‌ राज्यमंत्रिपदाचा दर्जाही त्यांना प्राप्त झाला. त्यामुळे सासवडहून संपूर्ण कुटुंबीय पुण्यात स्थायिक झाले. परंतु, ग्रामीण भागाशी असलेली नाळ मात्र कधीही तुटली नाही. पुण्यातही क्रीडा स्पर्धेतील सहभागात तृप्ती कधीही खंड पडू दिला नाही. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अव्वल असायच्या.

वडिलांना राजकारणात अनेक प्रशासकीय पदांचा कार्यभार सांभाळण्याची व लाल दिव्याची गाडी हे सर्व मिळत गेले. परंतु, याची हवा तृप्ती यांच्या डोक्‍यात कधीही त्यांनी येऊ दिली नाही. वडिलांचा त्यांना नेहमी सल्ला असायचा की, 'मला समाजात मिळालेला मानसन्मान, प्रतिष्ठा हे वैयक्तिक माझे आहे. हे तुम्हाला समाजात वावरत असताना कुठेही मिळणार नाही. कोलते साहेबांची मुलगी आहे असे कुठेही मिरवायचे नाही. त्यासाठी ऐन उमेदीच्या काळात तुम्हाला तुमची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी लागेल.' त्यामुळे समाजात आपलीदेखील एक वेगळी ओळख निर्माण करायची हे तृप्ती यांनी मनात पक्क केलं होतं.

गुणवत्तेच्या बाबतीत अगदी सामान्य विद्यार्थी असल्याने स्पर्धा परीक्षेचा विचारदेखील करणे तृप्ती यांच्यासाठी मुश्‍कील होते. परंतु, आई-वडिलांची साथ असल्याने आयुष्यात एक चांगली पत्रकार अथवा वकील व्हायचं म्हणून फर्ग्युसन महाविद्यालयातून कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. या महाविद्यालयातून क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पत्रकारितेचेही शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे या काळात स्पर्धा परीक्षेची एकप्रकारे पूर्वतयारी झाली होती. तेव्हा मैत्रिणींनी स्पर्धा परीक्षा करू शकतेस, असा आत्मविश्वास निर्माण करून दिला.

तृप्ती कोलते-पाटील
रेल भूमी विकास प्राधिकरणमध्ये सरकारी नोकऱ्या! असा करा अर्ज

तृप्ती यांनी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला. ऐनवेळी घेतलेला हा निर्णय त्यांच्यासाठी आश्‍चर्यकारक होता. साधारणत: एक वर्षभर त्यातही सहा महिने अगदी जोमाने प्रयत्न केले. आत्मविश्वास व चिकाटीच्या जोरावर परीक्षेस सामोरे गेल्या अन्‌ पहिल्याच प्रयत्नात एकाचवेळी राज्यसेवेतून पोलिस उपनिरीक्षक व नायब तहसीलदार म्हणून उत्तीर्ण झाल्या. पोलिस उपनिरीक्षकचे प्रशिक्षणदेखील घेतले, परंतु नायब तहसीलदार पदासाठी प्राधान्य देत ते पद स्वीकारले. या यशामुळे आई- वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. घरातील परिस्थिती अगदी व्यवस्थित असतानाही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची, या ध्येयासाठी जिद्दीने केलेला प्रयत्न यशस्वी झाला. सध्या पदोन्नतीने तृप्ती कोलते-पाटील या पुणे जिल्ह्यातच हवेली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()