वाळूज : वाळूज (ता. मोहोळ) येथील प्रशांत हरिबा कादे यांनी एका गीर गायीच्या मदतीने तुपाची विक्रीसह शेती रसायनमुक्त करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी गाईचे शेण, गोमूत्र, दूध यांचा वापर करत रसायनविरहित शेतीची कास धरली आहे. प्रशांत कादे यांनी काही वर्षापूर्वी घरी देशी गाईचे दूध मिळावे यासाठी एक गीर गाय विकत घेतली. गीर गाईच्या दुधापासून नियमित तूप तयार करुन ते विकतात. त्यासोबत ताकाचा वापर शेतीसाठी करतात. गोमूत्र हे स्लरीने पिकांना ते देतात. एका गीर गाईपासून त्यांच्याकडे आता ५ जनावरे झाली आहेत. त्यामुळे त्यांनी सेंद्रिय खताची निर्मिती करण्यास सुरवात केली. त्यांच्या द्राक्ष बागेसाठी त्यांनी रासायनिक खत वापरणे पूर्णपणे बंद केले. केवळ ताक व गूळ एकत्र करून त्याचा उपयोग खत म्हणून केला.
तसेच गोमूत्राची मात्रा स्लरीमधून देण्यास सुरवात केली. रोगराई पडू नये म्हणून ते गोमूत्राची फवारणी देखील करतात. त्यांनी एक प्रयोग म्हणून द्राक्षाला दूध देखील मुळाशी देण्याचे काम केले. सध्या तरी द्राक्षाच्या बाबतीत त्यांचा रासायनिक खताचा खर्च ३० ते ३५ हजार रुपयांनी कमी झाला. आता फलधारणा होणार असल्याने लवकरच या प्रयोगाचे परिणाम पाहण्यास मिळणार आहेत. जर या प्रयोगाचे साईड इफेक्ट काहीच नाही तर ते करून पाहण्यास काय अडचण आहे, अशी त्यांची भूमिका आहे. आता ऊस व सोयाबीन लागडीसाठी त्यांनी रसायनमुक्त शेती करण्याचे ठरवले आहे.
ठळक बाबी
एकूण ५ जनावरे
गीर गाईच्या तुपाची दर महिन्याला ६ किलोची विक्री
तुपाची २५०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री
ताकाचा उपयोग पिकांसाठी
गोमूत्र व शेणाच्या स्लरीचा पिकांसाठी उपयोग
द्राक्षाच्या वेलीला मुळाशी गाईचे दूध टाकण्याचा प्रयोग
गीर गाईच्या मदतीने नैसर्गिक शेती करण्याचे काम सुरु केले. तेव्हा पासून रासायनिक खताच्या खर्चात थेट बचत झाली. तुपाच्या विक्रीतून उत्पन्न मिळू लागले. द्राक्षबागेत सेंद्रिय खताचाच प्रयोग केला आहे. आता संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करण्याचा निर्धार आहे.
- प्रशांत हरिबा कादे, वाळूज,ता. मोहोळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.