सोलापूर : हृदयरुग्णाच्या हृदयातील दोन कप्प्यामध्ये चकती बसवण्याची अत्यंत अवघड शस्त्रक्रीया अश्विनी रुग्णालयाचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे व टीमने यशस्वी करून दाखवली आहे. एका ५३ वर्षाच्या रुग्णाची तीव्र स्वरूपाच्या हार्ट अटॅकनंतर दुसऱ्या एका शहरात इमर्जन्सी अँजिओप्लास्टी झाली होती. दुर्दैवाने त्या रुग्णाला हार्ट अटॅकचे एक जीवघेणे असे कॉम्प्लिकेशन निर्माण झाले. त्यामध्ये हृदयाच्या दोन महत्त्वाच्या कप्प्यामधील पडद्याला मोठे छिद्र पडले. हे जेव्हा घडते तेव्हा सामान्यतः मृत्यू अटळ असतो.
हा रुग्ण जेव्हा अश्विनी सहकारी रुग्णालयाचे हृदयरोग तज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांच्याकडे ॲडमिट झाला. त्यावेळी त्याची अवस्था अतिशय गंभीर होती. त्याची नाडी व्यवस्थित लागत नव्हती व ब्लड प्रेशर अतिशय कमी झाले होते. त्यामुळे रुग्णास कृत्रिम श्वसनाची गरज भासत होती.
अशा रुग्णांमध्ये त्वरित ऑपरेशन करून छिद्र बंद केले तरच प्राण वाचण्याची शक्यता असते. पण त्याचीही शंभर टक्के खात्री नसते. तसेच ओपन हार्ट सर्जरीचा धोकाही खूप अधिक असतो. बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेद्वारे एक छोटीशी चकती बसवून हे छिद्र बंद करण्याचे नवीन तंत्रज्ञान आता आले आहे. अर्थातच यामध्ये ऑपरेशन सारखाच पण जरा कमी प्रमाणात असेल तरीही धोका असतो.
रुग्ण वाचण्याची खात्री देता येत नाही, हे अतिशय अवघड गुंतागुंतीचे ऑपरेशन असते. त्यामध्ये जांघेतील आणि मानेतील रक्तवाहिनीद्वारे तयार करून ही चकती छिद्राच्या दोन्ही बाजूला बसून तेथील रक्तप्रवाह बंद केला जातो. अश्विनी सहकारी रुग्णालयामधील हृदयरोगज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी हे ऑपरेशन यशस्वी केली. त्यानंतर आयसीयूमध्ये ॲडमिट होता. पण गेल्या आठवड्यापासून रुग्णाची अवस्था सामान्य झाली आहे. तो चालू फिरू लागला आहे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया देशात फार कमी ठिकाणी यशस्वी झाल्या आहेत. या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. संतोष कलशेट्टी त्यांची टीम आणि कर्मचाऱ्यांची मोलाची मदत झाली. अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपीनभाई पटेल, व्हॉईस चेअरमन डॉ. विजय पाटील यांनी डॉ. गुरुनाथ परळे व टीमचे अभिनंदन केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.