ऐन सणासुदीत महागाईमुळे साखरही होऊ लागली कडू

sugar
sugarsugar
Updated on
Summary

ऐन सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांची जीवन जगणे अवघड होत आहे. आता तर महागाईच्या या खेळांमध्ये गोड साखरेनेही उडी घेतली आहे.

केतूर (सोलापूर) : पेट्रोल, डिझेलचे दर वरचेवर वाढत असतानाच घरगुती गॅस, गोडेतेल याची दरही वरचेवर वाढत आहेत. सर्वसामान्य नागरिक महागाईने हैराण झाला असतानाच, गेल्या दीड महिन्यापासून साखरेचे दरही वरचेवर वाढत आहेत. दोन महिन्यापूर्वी 32 रुपये किलो दराने मिळणारी साखर सध्या 38 रुपये किलो या दराने विकत घ्यावी लागत आहे. आगामी सण-उत्सवाच्या काळात साखरेचे किरकोळ विक्रीचे दर बाजारात 38 रुपये किलोपर्यंत गेला आहे. गेल्या काही महिन्यातील हा उच्चांकी दर समजला जात आहे. ऐन सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांची जीवन जगणे अवघड होत आहे. आता तर महागाईच्या या खेळांमध्ये गोड साखरेनेही उडी घेतली आहे.

sugar
दक्षिण सोलापूर म्हणजे भाविकांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणी !

कोरोना संसर्गाच्या या काळात साखरेचे दर स्थिर होते. उत्पादन जास्त आणि मागणी कमी यामुळे साखरेचे दर स्थिर होते असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे, परंतु सध्या सुधारलेल्या वातावरणामुळे व जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने हॉटेल्स, मिठाईची दुकाने सुरु झाल्याने साखरेला मागणी वाढली आहे व वरचेवर ती वाढतच आहे. केंद्र सरकारकडून साखरेची 3100 रुपये क्विंटल विक्री दर निश्चित केली आहे. साखर कारखान्यातील साखरेची गोदामे भरून गच्च आहेत तरीही, बाजारात भाव वाढू लागले आहेत व ते 38 रुपये किलोवर जाऊन पोहचले आहेत. आगामी सणासुदीच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिक महागाईच्या राक्षसाला मात्र वैतागली आहेत. साखरेचे दर वाढू लागल्याने साखर कारखाने शेतकऱ्यांना राहिलेली एफआरपीची रक्कम देतील का हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

sugar
पाहा आध्यात्मिक पर्यटनाची 'पंढरी' सोलापूर जिल्हा !

"कोरोना संदर्भातील नियम अटी निर्बंध हळूहळू जात असल्याने हॉटेल्स मिठाईची दुकाने चहा दुकाने सुरू होत आहेत. त्यामुळे साखरेला मागणी वाढली आहे. मात्र बाजारात साखरेचे दर वाढत आहेत. सध्या 38 रुपये किलो दराने साखर विक्री केली जात आहे. आगामी सणासुदीच्या काळात साखर आणखी दोन-तीन रुपयांनी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

- दिलीप खेडकर, किराणा दुकानदार

"एकीकडे कोरोना महामारी च्या संकटाचा सामना करीत असतानाच वाढणार्‍या महागाईमुळे आर्थिक झळ सहन करावी लागत आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र मेटाकुटीला आला आहे.

- दिनेश माने, ग्राहक

"साखर हा किराणा व्यापाऱ्यातील महत्त्वाचा घटक असून, त्यावर पुढील व्यापार अवलंबून असल्याने शक्यतो बहुतेकवेळा खरेदी किमतीने साखर विक्री करावी लागत आहे.

-सुहास निसळ, व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.