सीना नदी वाहू लागल्याने या वर्षी उसाची लागवड वाढली 

us lagwad.jpg
us lagwad.jpg
Updated on

पोथरे(सोलापूर): या वर्षी ऑगस्ट महिन्यात पासूनच सीना नदी वाहू लागल्याने नदी परिसरातील पाणीपातळी वाढली आहे. एवढेच नाही तर करमाळा तालुक्‍यातील सिना नदीवरील खडकी, तरडगाव व संगोबा बंधारे पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने त्यामुळे येथील शेतकरी समाधानी झाला आहे. त्यामुळे नदी काठावरील पंधरा गावात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड सुरू आहे. 

करमाळा तालुक्‍यातील उत्तर भागाला सिना नदी एक वरदान आहे. मात्र सततचा दुष्काळी स्थिती व नदीवरील बंधारे तलाव यामुळे नदीला पाणी येणे दुसर झाली आहे. यावर्षी मात्र सुरुवातीलाच नगर भागात दमदार पाऊस झाल्याने सीना नदी वरील कर्जत तालुक्‍यातील निमगाव गांगुर्डे धरण या वर्षी 10 ऑक्‍टोंबरलाच पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे यावर्षी सीना नदीला मुबलक प्रमाणात पाणी वाहत आहे. 

एवढेच नाही तर या पाण्यावर कोळगाव धरणातील पाणीसाठा शंभर टक्के कडे वाटचाल करत आहे. करमाळा तालुक्‍यातील खडकी, आळजापूर, तरडगाव, बिटरगाव श्री, बाळेवाडी, पोटेगाव, निलज, बोरगाव, दिलमेश्वर, खांबेवाडी, करंजे, भालेवाडी अशी पंधरा गावे सीना नदीकाठवर आहेत. एवढेच नाही तर या वर्षी नदीवरील खडकी तरडगाव व संगोबा बंधाराही शंभर टक्के भरणार असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात उसाची लागवडीची लगबग सुरू झाली आहे. 

बंधारे पूर्णपणे भरावेत 
ऊसाला उन्हाळ्यात पाणी टिकण्यासाठी नदीवरील तिन्ही बंधारे शंभर टक्के भरावे लागतील. बंधाऱ्याची दारे टाकण्यास विलंब होऊन बंधारे शंभर टक्के भरले नाही तर उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. 
- ऍड. शशिकांत नरूटे बोरगाव. 

उसक्षेत्रात वाढ 
गेली अडीच महिन्यांपासून नदी वाहत असल्याने पाणी पातळी चांगली वाढली आहे. त्यामुळे इतर पिकाला फाटा देऊन ऊसक्षेत्र वाढवले आहे. 
- अण्णासाहेब नरूटे, शेतकरी खांबेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.