प्रशासनाचे तोंडावर बोट! ऊस तोडणीसाठी एकरी आठ हजार रुपयांची मागणी

18-19 महिने सांभाळलेला ऊस शेतात तसाच उभा असून त्याचे दिवसेंदिवस वजन घटत असून तुरा येऊ लागल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. अशातच ऊस तोडणी कामगारांकडून एकरी आठ हजार रुपयांची मागणी होत आहे.
ऊस खाक
ऊस खाकsakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील 33 साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप सध्या सुरु आहे. जिल्ह्यात एकूण एक लाख 71 हजार हेक्‍टरवरील ऊस अजूनही तोडणी झालेला नाही. 18-19 महिने सांभाळलेला ऊस शेतात तसाच उभा असून त्याचे दिवसेंदिवस वजन घटत असून तुरा येऊ लागल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. अशातच ऊस तोडणी कामगारांकडून एकरी आठ हजार रुपयांची मागणी होत आहे. दुसरीकडे ऊस तोडायला अडचण असल्याचे कारण सांगून अख्खा फड पेटवून देण्याचेही प्रकार समोर आले आहेत.

ऊस खाक
सोलापूर : वाढीव पर्जन्यमानामुळे डाळिंब धोक्‍यात

उसाची लागवड केल्यापासून साधारणत: दीड वर्षांत ऊस तोडून कारखान्याला जातो. परंतु, आता 19-20 महिने होऊनही कारखान्याने ऊस नेलेला नाही. बहुतेक शेतकऱ्यांनी उसाची नोंद केलेली नाही. त्यांच्यासमोरही ऊस कारखान्याला घालण्याची अडचण आहे. वर्षाअखेरीस बॅंकांचे कर्ज तथा कर्जाचा हप्ता देणे, खताची उधारी देणे, मशागतीचे पैसे, मुलांच्या शिक्षणाचा, विवाहाचा खर्च भागविणे, अशी अनेक संकटे शेतकऱ्यांसमोर सध्या आहेत. शेतात ऊस तोडायला आलेल्या कामगारांकडून जेवण, झारचे पाणी, पैशांची मागणी केली जात असल्याचे गाऱ्हाणे शेतकरी मांडू लागले आहेत. त्यांच्याबद्दल तक्रार केली तर ते ऊस तोडून नेणार नाहीत, अशी भीती असल्याने ते तक्रारदेखील करीत नसल्याची स्थिती आहे. उसाच्या फडात गवत आणि ऊस आडवा पडल्याने तोडायला अडचण असल्याचे सांगून तो फड पेटवून तोडणी केली जात असल्याचेही अनेकांनी सांगितले. अशा अडचणीच्या काळात ना शेतकरी संघटनांचे नेते ना जिल्हा प्रशासन ना साखर आयुक्‍तालयातील अधिकारी त्यांच्या मदतीला येत आहेत, अशी दयनीय आवस्था झाली आहे. ऊस नेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असल्याने कारखानदारांकडून त्यांना एकरकमी एफआरपीदेखील दिली जात नसल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे स्वतंत्रपणे बैठक घेऊन त्यावर मार्ग काढतील का, असा प्रश्‍न शेतकरी विचारू लागले आहेत.

ऊस खाक
अतिरिक्‍त उसाने डोळ्यात अश्रू! शेतात ऊस जळतोय, तरीही शेतकरी संघटना गप्प का?

शेतकरी नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, कुठे आहात?
राज्यातील ऊस लागवडीच्या क्षेत्राचा अंदाज असतानाही आणि पावणेदोनशे कारखान्यांचे गाळप सुरु असतानाही बहुतेक जिल्ह्यांमधील ऊस अजूनही उन्हाचे चटके खात तसाच उभा आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील गाळप हंगाम एप्रिलअखेर तर मराठवाड्यातील गाळप हंगाम 20 मेपर्यंत चालेल, अशी स्थिती आहे. काही कारखानदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस पहिल्यांदा न तोडता कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणला. त्यामुळे स्वत:च्याच कार्यक्षेत्रातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशावेळी शेतकरी संघटना व संघटनांचे नेते आवाज उठविताना दिसत नाहीत, हे विशेष. माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, रयतक्रांतीचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत हे कुठे आहेत, असा प्रश्‍न शेतकरी विचारू लागले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()