मी ज्या वेळेस सत्तेत होतो, त्यावेळी जर माझ्या लक्षात आले असते तर मी तेव्हाच ती अधिकृत करून दिली असती.
सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची (Siddheshwar Cooperative Sugar Factory) चिमणी पाडून ज्यांना सभासद शेतकरी, कामगार व काडादींचे वाटोळे करायचे होते, त्यांनी केले. पण, विमानसेवा सुरु करण्यासाठी चिमणी पाडण्याची गरज नव्हती.
विमाने व्यवस्थित उतरू शकली असती, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर आता त्या शेतकरी सभासद व कामगारांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न, कारखाना सुरु करण्यासाठी काय उपाय करता येतील, यासंदर्भात शुक्रवारी सुशीलकुमार शिंदे यांनी धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी त्यांच्यात (Sushil Kumar Shinde) बराच वेळ चर्चा झाली. भेटीनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'मी कॉलेजमध्ये असल्यापासून माझे काडादी यांच्याशी संबंध आहेत. सहकारी तत्त्वावरील सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली, याची चौकशी मी करायला आलो आहे.
राजकारणातून चिमणी पाडण्यात आली, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, मुळात चिमणी पाडण्याची गरजच नव्हती. आमची सर्व विमाने एका बाजूने उतरतात. पायलटला व्यवस्थित सूचना दिल्यानंतर विमाने व्यवस्थित उतरतात आणि टेक ऑफ होतात. परंतु, ज्यांना यांचे वाटोळे करायचेच होते, त्यांनी ते केले आहे.'
पण, सभासद, कामगारांच्या प्रश्नावर कोणीच काही बोलत नाही, यांचे आश्चर्य त्यांनी व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, रेवणसिद्ध आवजे, रॉकी बंगाळे, तिरुपती परकीपंडला, पृथ्वीराज नरोटे आदी उपस्थित होते.
कारखान्याची चिमणी अनधिकृत म्हणजे ती गेली अनेक वर्षे तिथं आहे. त्यांनी अधिकृत करण्याचा प्रयत्न केला, परंतु मला ती अनधिकृत असल्याची माहिती नव्हती. मी ज्या वेळेस सत्तेत होतो, त्यावेळी जर माझ्या लक्षात आले असते तर मी तेव्हाच ती अधिकृत करून दिली असती, असे देखील सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.