महाविकास आघाडीसाठी कॉम्प्रमॉईज करावेच लागेल : सुशीलकुमार शिंदे

महाविकास आघाडीसाठी कॉम्प्रमॉईज करावेच लागेल : सुशीलकुमार शिंदे
सुशीलकुमार शिंदे
सुशीलकुमार शिंदेSakal
Updated on
Summary

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता. 27) कॉंग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

सोलापूर : कोणी एका पक्षाचा अध्यक्ष म्हणतो म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होत नाही. त्यासाठी निकष असून तशी परिस्थिती निर्माण व्हायला लागते, तेव्हाच राष्ट्रपती राजवट लागू होते, अशी खोचक टीका माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी भाजप (BJP) तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर केली. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता. 27) कॉंग्रेस (Congress) भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी प्रदेश निरीक्षक सोनम पटेल (Sonam Patel), निरीक्षक चेतन चव्हाण (Chetan Chavan), माजी आमदार निर्मला ठोकळ (Nirmala Thokal), विश्‍वनाथ चाकोते (Vishwanath Chakote), नगरसेवक चेतन नरोटे (Chetan Narote), विनोद भोसले (Vinod Bhosle), गणेश डोंगरे (Ganesh Dongare) आदी उपस्थित होते. (Sushilkumar Shinde said that have to compromise for the Mahavikas Aghadi)

सुशीलकुमार शिंदे
रेड झोनमध्ये 13 जिल्हे! Omicron व Corona चे वाढले अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण

मागील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करताना शिंदे म्हणाले, एकाने ही निवडणूक जात पुढे करून लढविली तर दुसऱ्याने धर्माच्या नावे मते मागितली. त्यामुळे रक्‍त आणि भक्‍तांनी शहर- जिल्ह्याची वाट लावली, हे आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचे वक्‍तव्य बरोबरच असल्याचे म्हणत, त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे (Wanchit Bahujan Aghadi) सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी (Dr. Jaysiddheshwar Mahaswami) यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

सुधीर खरटमल (Sudhir Kharatmal) हे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांनी आतापर्यंत दोनदा पक्ष सोडला आहे. जे जायचे ते जाऊ द्या, कॉंग्रेस पुन्हा निश्‍चितपणे उभारेल, सोडून गेलेल्यांना पाहून घेतो. आता मी रिटायर झालो असून आमदार प्रणिती शिंदे याच नेत्या आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. देशाच्या, राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने सर्व पक्षातील नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध असावेत. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee), माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lalkrishna Advani) यांच्यासोबत माझेही चांगले संबंध होते, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

सुशीलकुमार शिंदे
वयोमर्यादा संपलेल्यांची निराशा! राज्यसेवेसाठी अर्जाची संधी हुकली

महाविकास आघाडीसाठी कॉम्प्रमॉईज आवश्‍यक

देशातील कॉंग्रेसपुढे तीनवेळा वाईट काळ येऊन गेला; तरीही न डगमगता कॉंग्रेस आपल्या विचारधारेवर पुन्हा नव्या जोमाने उभारला. कॉंग्रेसने जाती-धर्माऐवजी सर्वधर्म समभाव जपला आहे. जाती- धर्माच्या नावाखाली मते मागणाऱ्यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय झाला. परंतु, कॉंग्रेस पुन्हा एकदा ताठ मानेने उभारेल, असा विश्‍वास सुशीलकुमार शिंदे यांनी या वेळी व्यक्‍त केला. राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) टिकविण्यासाठी ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद मोठी आहे, त्या ठिकाणी कॉम्प्रमॉईज करावे लागेल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. स्वतंत्रपणे लढून विरोधकांना संधी देण्यापेक्षा तिघांनी एकत्रितपणे लढल्यास निश्‍चित फायदा होईल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.