Solapur Murder: आत्याच्या पतीचा संशयावरून खून, खिलारवाडी येथील खळबळजनक घटना

Murder: गजेंद्र यांनी फोन उचलला नाही. गाडी पुढे आली असता त्यांना गजेंद्र शिंदे दुचाकीवरून येताना दिसले.
murder
murdersakal
Updated on

Latest Solapur News: आत्याच्या पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून खिलारवाडी (ता. सांगोला) येथील तरुणाने आत्याच्या पतीचा डोक्यात लोखंडी पाइपने मारून खून केला. ही घटना मंगळवार (ता. २७) रोजी सायंकाळी सव्वासात ते साडेसातच्या दरम्यान घडली.

याबाबत मृताचा मुलगा सौरभ गजेंद्र शिंदे (रा. खिलारवाडी) याने सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत सौरभ शिंदे यांनी म्हटले आहे, की मंगळवारी (ता. २७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याचा मामेभाऊ सागर इंगोले हा घरी आला. सौरभ शिंदे यांचे वडील गजेंद्र विश्वनाथ शिंदे (वय ५५) यांचे अनैतिक संबंध असून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.

murder
सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर माढ्यातून मोहितेंचा विजय

यावेळी घरात गजेंद्र शिंदे सापडले नसल्याने सागर रागाने घराबाहेर पडला. गजेंद्र शिंदे यांचे मित्र गोपाळ चव्हाण व मुबारक मुलाणी हे दोघे त्याला भेटले. या दोघांना सागरने जबरदस्तीने गाडीत बसवून घेतले. या दोघांना गजेंद्र शिंदे यांना फोन लावून बोलावून घेण्यास सांगितले. मात्र गजेंद्र यांनी फोन उचलला नाही. गाडी पुढे आली असता त्यांना गजेंद्र शिंदे दुचाकीवरून येताना दिसले.

murder
Solapur Rain: ऐतिहासिक आष्टी तलावाचा पाणीसाठा वाढला; शेतक-यांना सतर्कतेचा इशारा

गजेंद्र शिंदे यांना शिवीगाळ करून जबरदस्तीने सागर इंगोले यांनी गाडीत बसविले. तेथून ही गाडी गादेगाव, वाखरी, कराड रोड या भागात वेगाने फिरविली. पुढे शिरभावी (ता. सांगोला) गावातील वनीकरणात सायंकाळी सव्वासात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान गजेंद्र शिंदे यांना गाडीतून खाली बोलावून घेतले व डोक्यात लोखंडी पाइपने जोराने मारून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक पवन मोरे हे या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी सागर इंगोले यास अटक करण्यात आली आहे.

murder
Solapur Tourism : सोलापूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटनाच्या २८२ कोटींच्या आराखड्याला मंजुरी

Related Stories

No stories found.