Teacher's Day : जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार : २४ शिक्षकांचा होणार सन्मान

व्हिडिओ चित्रीकरणात झाली निवड प्रक्रिया
solapur zp
solapur zp sakal
Updated on

Solapur News- शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया आज व्हिडिओ चित्रीकरणात झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली २०२२-२०२३ या वर्षासाठी जिल्ह्यातील २४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या आठवड्यात या पुरस्कारांचे वितरण करण्याची तयारी जिल्हा परिषदेने केली असल्याचे समजते.

पुरस्कारार्थी निवडण्यासाठी झालेल्या या बैठकीला प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खामितकर, महिला व बालकल्याण अधिकारी तथा प्राथमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिकचे प्रभारी शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

solapur zp
Solapur News : उजनीतून ना शेतीला ना पिण्यासाठी पाणी

सर्वसाधारण संवर्गातून दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये करुणा गुरव (जि. प. शाळा मिरजगी, ता. अक्कलकोट), संगीता बांगर (जि. प. शाळा गाताचीवाडी, ता. बार्शी), प्रफुल्लता सातपुते (जि. प. शाळा वैदवस्ती, देवळाली, ता. करमाळा), प्रतिभा नवले (जि. प. शाळा केदारवस्ती, उपळाई, ता. माढा), सोनी कानडे (जि. प. शाळा माळशिरस),

अमित भोरकडे (जि. प. शाळा आसबेवाडी, ता. मंगळवेढा), परवेज मा. रफिक शेख (जि. प. शाळा, भोसलेवस्ती, ता. मोहोळ), चंद्रकांत माळी (जि. प. शाळा, कोरके वस्ती - दोन, ता. पंढरपूर), खुशालोद्दीन उस्मान शेख (जि. प. शाळा, सांगोलकर-गवळी वस्ती, ता. सांगोला), शुभांगी पवार (जि. प. शाळा, बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर), मानसिंग पवार (जि. प. शाळा, बाळगी, ता. दक्षिण सोलापूर).

solapur zp
Radhika Madan: तुला पाहताच मनात वाजली..Dhan Te Nan..ची धून

माध्यमिक संवर्गातील पुरस्कार माढा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील किरण भांगे यांना तर विशेष पुरस्कार मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेतील यशवंत कांबळे यांना जाहीर झाला आहे. शिष्यवृत्ती पुरस्कारामध्ये अंबाराय उजनी (जि. प. शाळा सिन्नुर क, ता. अक्कलकोट), सोमेश्वर देशमाने (जि. प. शाळा पानगाव - दोन, ता. बार्शी), राणी क्षीरसागर (जि. प. शाळा वरकरने, ता. करमाळा),

अशोक ढोबळे (जि. प. शाळा मोडनिंब नं. एक, ता. माढा), वैशाली भागवत (जि. प. शाळा पिलीव मुले, ता. माळशिरस), शोभा कोलते (जि. प. शाळा भाळवणी, ता. मंगळवेढा), दत्तात्रय डोके (जि. प. शाळा पापरी, ता. मोहोळ), शरद बिराजदार (जि. प. शाळा नेमतवाडी, ता. पंढरपूर), स्वाती निळकंठ (जि. प. शाळा एकतपुर, ता. सांगोला), सरस्वती पवार (जि. प. शाळा अकोलेकाटी, ता. उत्तर सोलापूर), विलास गिराम (जि. प. शाळा संगदरी, ता. दक्षिण सोलापूर).

solapur zp
Chandrakant Dada Patil: शालेय शिक्षणापासून वंचितांना ‘मुक्‍त’ने शिकवावे : मंत्री चंद्रकांत पाटील

दोन वर्षांचे पुरस्कार पुन्हा रखडले

जिल्हा परिषदेच्यावतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांमधील २०२०-२०२१ व २०२१-२०२२ या दोन वर्षांच्या पुरस्कारांना आजही मुहूर्त मिळालेला नाही. जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या काळात या पुरस्कारांची सर्व गुणदान प्रक्रिया पूर्ण करुन ठेवण्यात आली आहे.

या पुरस्कारांची घोषण आज होईल अशी अपेक्षा शिक्षकांना होती. आज फक्त एकाच वर्षाच्या पुरस्कारांची घोषणा झालेली आहे. पुरस्कार वितरण एकाच वर्षाचे होणार की वितरणापूर्वी मागील पुरस्कारांची घोषणा करून एकाचवेळी तिन्ही वर्षांचे पुरस्कार वितरण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.