ग्रंथपालाच्या तक्रारीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी थांबवला शिक्षकांचा पगार

teachers
teachers
Updated on
Summary

वैराग येथील विद्यामंदिर कन्या प्रशालेतील ग्रंथपाल मनोज रणदिवे यांनी संस्थेविरूध्द माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्याकडे तक्रार दिली. शासनाने पूर्णवेळ ग्रंथपाल नियुक्‍तीचा आदेश देऊनही संस्थेने नियुक्‍ती दिलेली नाही. त्यामुळे मला न्याय मिळावा, अन्यथा मी आत्मदहन करेन, असा इशाराही त्यांनी पत्रातून शिक्षणाधिकाऱ्यांना दिला.

सोलापूर: वैराग (ता. बार्शी) येथील विद्यामंदिर कन्या प्रशालेतील 26 शिक्षकांनी तीन महिन्यांपासून पगार नसल्याने शाळेसमोरच आमरण उपोषण सुरु केले आहे. ग्रंथपाल व संस्थेच्या वादात शिक्षकांचा पगार का थांबविला, असा प्रश्‍न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तर शिक्षणाधिकारी म्हणतात, संस्थेने ग्रंथपालाचा प्रस्ताव सादर केल्याशिवाय पुढील कार्यवाही होणार नाही.

teachers
दक्षिण सोलापूर म्हणजे भाविकांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणी !

संस्थेचे अर्धवेळ ग्रंथपाल मनोज रणदिवे यांना पूर्णवेळची मान्यता द्यावी, असा शालेय शिक्षण विभागाने निर्णय दिला आहे. तरीही, संस्थेने त्या कर्मचाऱ्याचा प्रस्ताव पाठविला नसल्याने संबंधित कर्मचाऱ्याने संस्थेविरूध्द यापुर्वी उपोषण केले आहे. आता त्यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला आहे. त्यांच्या पत्रानुसार संस्थेतील शिक्षकांच्या पगारी थांबविल्या असून संस्थेने त्यासंबंधी काहीच कार्यवाही केलेली नाही, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी बाबर म्हणाले. परंतु, रणदिवे यांच्या तक्रारीचा वाद न्यायालयात सुरु असल्याने पगार थांबविण्याचा अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना नाही, असे उपोषणकर्त्या शिक्षकांचे म्हणणे आहे. 16 ऑगस्ट रोजी त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह वैराग पोलिस ठाणे व संस्थेला निवेदन दिले. तरीही, काहीच तोडगा निघाला नसल्याने त्यांनी आता आमरण उपोषण सुरु केले आहे.

teachers
पाहा आध्यात्मिक पर्यटनाची 'पंढरी' सोलापूर जिल्हा !

संस्थेने तत्काळ प्रस्ताव पाठवावा

तक्रारदार ग्रंथपाल रणदिवे यांच्या पूर्णवेळ नियुक्‍तीचा प्रस्ताव संस्थेने शिक्षणाधिकारी कार्यालयाला तत्काळ सादर करावा. त्यांना आम्ही मान्यता देऊन त्यांची नियुक्‍ती केली जाईल. त्यानंतर सर्वांचा पगार होईल, अशी भूमिका माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी घेतली आहे. दुसरीकडे उपोषणकर्ता शिक्षक म्हणाले, तीन महिन्यांपासून पगार नसल्याने बॅंकेच्या कर्जाचे हप्ते, घरखर्च भागविणे कठीण झाले असून संस्था आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या वादात आम्हाला वेठीस धरू नये. त्यासंदर्भात सोमवारी (ता. 23) सुनावणी होणार असून त्यावेळी काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

teachers
सोलापूर जिल्ह्यातील 'या' दोन गावातील शेतकऱ्यांना मिळते दिवसा वीज

विद्यामंदिर कन्या प्रशालेतील शिक्षकांचे आमरण उपोषण

वैराग येथील विद्यामंदिर कन्या प्रशालेतील ग्रंथपाल मनोज रणदिवे यांनी संस्थेविरूध्द माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्याकडे तक्रार दिली. शासनाने पूर्णवेळ ग्रंथपाल नियुक्‍तीचा आदेश देऊनही संस्थेने नियुक्‍ती दिलेली नाही. त्यामुळे मला न्याय मिळावा, अन्यथा मी आत्मदहन करेन, असा इशाराही त्यांनी पत्रातून शिक्षणाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी रणदिवे यांचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा, असे संस्थेला कळविले. दरम्यान, प्रभारी मुख्याध्यापिकेला दिलेला स्वाक्षरीचा अधिकारदेखील रद्द केल्याने शिक्षकांचा पगार थांबला आहे. आता या विरोधात कन्या प्रशालेतील 26 शिक्षकांनी शाळेतच आमरण उपोषण सुरु केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.