चेसी क्रॅक बसची होणार पुण्याच्या संस्थेकडून तांत्रिक तपासणी ! तपासणीची मुदत अडीच महिने; अहवालाकडे लक्ष 

Bus
Bus
Updated on

सोलापूर : महापालिकेला मिळालेल्या चेची क्रॅक बसच्या प्रकरणामध्ये लवकरच तिऱ्हाईत संस्थेकडून तपासणी होणार असून, या तपासणीचा मक्‍ता पुण्याच्या एक्‍स ब्रेन टेक्‍नॉलॉजी या संस्थेला मिळालेला आहे. 

केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत सोलापूर महापालिकेला 190 बसेस मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी 144 बसेस महापालिकेत दाखल झाल्या, तर आलेल्या बसपैकी 98 बसच्या चेसी क्रॅक झाल्या असून एक बस जळाली आहे. ज्या बसच्या चेसी क्रॅक झाल्या आहेत, त्या बस सध्या भंगारात धूळखात पडून आहेत. त्या बसचे रजिस्ट्रेशनदेखील रद्द करण्यात आले असून महापालिकेकडून बसच्या कंपनीला बस बदलून देण्याची मागणी करण्यात आली होती. हा विषय लवादाकडे गेल्यानंतर लवादाने कंपनीचे पैसे महापालिकेने व्याजासह देण्यास सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने याबाबत जिल्हा न्यायालयात अपिल केले असून याच्या सुनावणीवेळी तिऱ्हाईत संस्थेकडून या बसची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. 

या बस ज्यावेळी महापालिकेकडे आल्या होत्या, त्याचवेळी या बसची तिऱ्हाईत संस्थेकडून तपासणी करावयास हवी होती. परंतु, ती करण्यात आली नव्हती. लवादाकडे हे प्रकरण गेल्यानंतरही तत्कालीन प्रशासनाने याच्या सुनावणीवेळी तारखांना हजर राहून म्हणणे दिलेले नाही. बसच्या कंपनीनेदेखील लवादामध्ये न जाता न्यायालयात दाद मागायला हवी होती, परंतु कंपनी लवादामध्ये गेल्यानंतर लवादाचा निर्णय हा महापालिकेच्या विरोधात गेला. त्यामुळे परिवहन समितीकडून शासकीय संस्थेमार्फत या बसची तपासणी करून घेण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु त्या संस्थांनी तपासणी करण्याबाबत प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या बसची तपासणी ही तिऱ्हाईत संस्थेकडून करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आता परिवहन समितीच्या सभेमध्ये या चेसी क्रॅक बसची तपासणी ही तिऱ्हाईत संस्थेकडून करण्याबाबतचा ठराव करून 11 डिसेंबरला पालिका आयुक्‍तांनी तिऱ्हाईत संस्थेकडून तपासणी करण्याबाबतची निविदा काढली होती. या निविदेसाठी चार संस्थांनी प्रतिसाद दिला होता. त्यापैकी एक्‍स ब्रेन संस्थेला हे काम देण्यात आले असून अडीच महिन्यात ही तपासणी करणे संस्थेला बंधनकारक आहे. 

या बस खरेदी करताना तत्कालीन आयुक्‍तांनी अनेक चुका केल्या नसत्या तर आता परिवहनची अशी बिकट अवस्था झाली नसती. शहराच्या मर्यादा न पाहता बस खरेदी करण्यात आली. दिल्लीमध्ये ज्या बसेस कंपनीने पाठवून दिल्या त्या बसेस सोलापुरात आल्याच नाहीत तर बस बदलून आल्या आहेत. 
- जय साळुंखे, 
सभापती, परिवहन समिती, सोलापूर महापालिका 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.