Solapur News : महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे आधुनिकीकरण

कर्मचाऱ्यांना मॅनहोलमध्ये उतरण्याचा धोका संपुष्टात; मलबा काढणे सुलभ
technological modernization of solapur municipal drainage department
technological modernization of solapur municipal drainage departmentSakal
Updated on

सोलापूर : महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील ड्रेनेज विभाग आता अत्याधुनिक होत आहे. महापालिकेने नवीन ८ डिसेल्टींग मशीन खरेदी केल्या आहेत. या मशीनमुळे आता कर्मचाऱ्यांचे मॅनहोलमध्ये उतरून धोकादायक काम टळणार आहे.

सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली - उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिक विभागाच्या वतीने ड्रेनेज विभागाचे सक्षमीकरण करण्यात येत आहे.

या अंतर्गतच महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील ड्रेनेज विभागाच्या ताफ्यात आता नवीन ८ मशीन दाखल झाल्या आहेत. यापूर्वी दोन अशा मशीन महापालिकेने खरेदी केल्या होत्या. त्या जुन्या झाल्या आहेत.

त्यात आता या नवीन आठ मशीनची भर पडली आहे. यामुळे आता प्रत्येक झोन कार्यालयाला एक मशीन उपलब्ध होणार आहे. ड्रेनेज लाईन मॅनहोलमधील मलबा काढणे आता सोपे झाले आहे.

या एका मशीनची किंमत ११ लाख ८० हजार रुपये आहे. टाटा एस गोल्ड कंपनीची ही मशीन आहे. १४ व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून या मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. शासनाच्या जीईएम पोर्टलवरून या मशीन घेतल्या आहेत, अशी माहिती वाहन विभागाचे अभियंता गिरीश पुकाळे यांनी दिली.

मेन होलमधील गाळ हाताच्या पंजाप्रमाणे ही मशीन उपसा करते. यामुळे कर्मचाऱ्याला चेंबरमध्ये उतरून धोकादायक परिस्थितीत गाळ काढण्याची गरज भासणार नाही. बुधवारी (ता. ३०) दुपारी या नवीन मशीनचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.