रांझणीत जुगार अड्ड्यावर तहसीलदारांचा छापा! 22 जणांवर गुन्हा दाखल

रांझणी येथे जुगार खेळणाऱ्यांवर तहसीलदारांनी गुन्हा दाखल केला
Gamblers
GamblersMedia Gallery
Updated on
Summary

दिवसाढवळ्या व राजरोसपणे सुरू असलेल्या येथील जुगार अड्ड्याबद्दल पोलिस अनभिज्ञ कसे? याविषयी आता चर्चा रंगू लागली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : संचारबंदीचा (Curfew) आदेश धुडकावून बिनदिक्कपणे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर (Gambling den) पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर (Tehsildar of Pandharpur Sushil Belhekar) यांनी छापा (Raid) टाकून कारवाई केली. यामध्ये 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दिवसाढवळ्या व राजरोसपणे सुरू असलेल्या येथील जुगार अड्ड्याबद्दल पोलिस (Police) अनभिज्ञ कसे? याविषयी आता चर्चा रंगू लागली आहे. (Tehsildar has registered a case against gamblers at Ranjhani)

Gamblers
14 जूनपासून ऑनलाइन शाळा ! शालेय शिक्षण विभागाची सावध भूमिका

विधानसभा पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. परिणामी यामध्ये अनेकांचा बळी गेला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही लोक गर्दी करून कोरोना संसर्गवाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत. कोरोनाचा अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी 31 मेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदीसह कडक लॉकडाउन (Lockdown) जाहीर केला आहे. तरीही पंढरपूर तालुक्‍यातील कोरोना (Covid-19) रुग्णसंख्या जैसे थे आहे. त्यातच होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या संशयित रुग्णांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. अशा लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यासाठी प्रशासनाने मोहीम सुरू केली आहे.

Gamblers
ग्रामीण भागातील कोरोना रोखण्यासाठी आता ग्रामस्तरीय समित्या !

तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी आज सरकोली, ओझेवाडी येथे भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर रांझणी येथे आले असता गारवा हॉटेलजवळ काही लोक संशयास्पद फिरत असताना दिसून आले. अधिक चौकशी केली असता गारवा हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर काही लोक जुगार खेळत असल्याचे समजले. तहसीलदार बेल्हेकर यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी 22 लोक जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. तहसीलदारांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या सर्व 22 जुगार खेळणाऱ्या लोकांवर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()