तेलंगणमधील सर्वांत लक्षवेधक ठरलेल्या कामारेड्डी मतदारसंघात आश्चर्यकारक निकाल लागला. या जागेवर खुद्द मुख्यमंत्री केसीआर राव आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांच्या उमेदवारीने सर्वांचे लक्ष या लढतीकडे लागले होते. पण या विद्यमान आणि भावी मुख्यमंत्र्यांचे आव्हान मोडून काढीत त्यांना चितपट करणारे भाजपचे उमेदवार कटिपल्ली व्यंकट रमण रेड्डी हे ‘हिरो’ ठरले.
तेलगंणात केसीआर यांच्या दहा वर्षांच्या सत्ता साम्राज्याला धक्का देत काँग्रेसने बहुमत मिळविले आहे. भाजपने आठ जागांवर विजय मिळविला आहे. यामध्ये कटिपल्ली रेड्डी (वय ५३) यांचा कामारेड्डीतील विजय हा अनपेक्षित अन महत्त्वपूर्ण ठरला आहे.
या जागेवर के.सी.चंद्रशेखर राव (केसीआर) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी हे राज्यातील दोन शक्तीशाली नेते मैदानात होते. मात्र त्यांना हरवून भाजपचे उमेदवार व्यंकट रमण रेड्डी यांनी बाजी मारली आहे. यामुळे ही जागा भाजपच्या खात्यात आली आहे. कामारेड्डी मतदारसंघात केसीआर दुसऱ्या व रेवंथ रेड्डी हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात ‘जायंट किलर’ ठरलेल्या कटिपल्ली व्यंकट रमण रेड्डी यांच्या विजयामध्ये सोलापूरचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा मोठा वाटा आहे. प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर कल्याणशेट्टी यांनी कामारेड्डी मतदारसंघात तब्बल दोन महिने तळ ठोकला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.