कुंभारीजवळ भरगच्च भरलेल्या जीपचे फुटले टायर; सहा ठार, आठ जखमी

कुंभारीजवळ भरगच्च भरलेल्या जीपचे फुटले टायर; सहा ठार, आठ जखमी
कुंभारीजवळ भरगच्च भरलेल्या जीपचे फुटले टायर; सहा ठार, आठ जखमी
कुंभारीजवळ भरगच्च भरलेल्या जीपचे फुटले टायर; सहा ठार, आठ जखमीSakal
Updated on
Summary

या अपघातात अंदाजे तीन ते चारजण जागीच ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वळसंग (सोलापूर) : अक्‍कलकोटहून सोलापुकडे येणाऱ्या जीपचे समोरील टायर फुटून जीप उलटल्याने कुंभारीजवळ मंगळवारी (ता. 16) सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. जीपमध्ये तब्बल 14 प्रवासी होते. अपघातानंतर जीप 100 ते 150 फुटापर्यंत फरफटत गेल्याने जीपमधील सर्व प्रवासी रस्त्यावर उडून पडले होते. या अपघातात सहाजण ठार झाले असून आठजण जखमी आहेत. जीपचालकाविरुध्द वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

घरातील कामे आवरुन विविध कामाच्या निमित्ताने अक्‍कलकोट व परिसरातील लोक सोलापुरच्या दिशेने येत होते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने मिळेल ते सोलापुरकडे येणाऱ्या जीपमध्ये बसले. सोलापूरपासून 14 किलोमीटर अंतरावरील कुंभारी परिसरातील गंगाप्रसाद पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. भरधाव वेगाने सोलापुरच्या दिशेने येणाऱ्या जीपचे ड्रायव्हर साईडचे टायर अचानक फुटले. चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीप उलटली. या अपघातात अक्षय लक्ष्मण शिंदे (रा. बणजगोळ, ता. अक्‍कलकोट), समर्थ प्रशांत अनंत, विशाल दगडू गोरसे, गुरुराज रविदद्र वांजरे, रमाबाई यलप्पा बनसोडे, विशाल यलप्पा बनसोडे (सर्वजण रा. अक्‍कलकोट), सैपन इब्राहिम वाडीकर (रा. गौडगाव, ता. अक्‍कलकोट), निजाम हनिफ मुल्ला (रा. वाघदरी, ता. अक्‍कलकोट) हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच वळसंग पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी जीपमधील काहीजण रस्त्यावर तर काहीजण रस्त्यापासून दूर अंतरावर पडले होते. काही वेळाने रुग्णवाहिकेला बोलावून जखमींना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. जखमीमधील काहीजण गंभीर असल्याचेही पोलिसांनी सांगितले. जीप चालक जलिल नझीर बागवान (ता. अक्कलकोट) हादेखील या अपघातात जखमी झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या प्रवाशांवर काळाचा घाला

बाहेरील कामे आटोपून सायंकाळी लवकर घरी येईन, असे सांगून घराबाहेर पडलेल्यांवर काळाने वाटेतच घाला घातला. या अपघातात कटव्वाप यल्लप्पा बनसोडे व बसवराज यल्लप्पा बनसोडे (दोघेही रा. ब्यागेहळ्ळी, ता. अक्‍कलकोट) या मायलेकाचा, आनंद इरप्पा गायकवाड, आनंद युवराज लोणारी (रा. अक्‍कलकोट), लक्ष्मण मुरलीधर शिंदे (रा. बणजगोळ, ता. अक्‍कलकोट) आणि सुनिता सुनिल महाडकर (रा. दोड्याळ, ता. अक्‍कलकोट) यांचा मृत्यू झाला. लोणारी हे शिक्षक होते, अक्‍कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मुलांचे ते शिक्षक होते. या अपघाताने अक्‍कलकोट तालुक्‍यावर शोककळा पसरली आहे.

एसटी संपामुळे जीपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या मागणीसाठी 4 नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. एसटी वाहतूक बंद असल्याने अनेकजण मिळेल त्या खासगी वाहनातून प्रवास करीत आहेत. एसटी बंद असल्याने चालकाने जीपमध्ये तब्बल 14 प्रवासी बसविले होते. अक्‍कलकोट ते सोलापूर या प्रवासादरम्यान हा अपघात झाल्याची माहिती वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.