सिद्धेश्‍वर यात्रेची परवानगी लालफितीत! 'या' दिवशी अंतिम निर्णय

सिद्धेश्‍वर यात्रेची परवानगी लालफितीत! 'या' दिवशी अंतिम निर्णय
सिद्धेश्‍वर यात्रा
सिद्धेश्‍वर यात्रा esakal
Updated on
Summary

सोलापुरात जानेवारीमध्ये गेल्या 800 ते 900 वर्षांपासून ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांची मोठी यात्रा (गड्डायात्रा) दरवर्षी भरते.

सोलापूर : कोरोनामुळे (Covid-19) दोन वर्षांपासून साधेपणाने साजरी झालेली श्री सिद्धेश्‍वर महाराजांची (Shri Siddheshwar Yatra, Solapur) जानेवारी 2022 मधील यात्रा व अक्षता सोहळा यंदा उत्साहात साजरा करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव श्री सिद्धेश्‍वर देवस्थान पंच कमिटीने (Shri Siddheshwar Devasthan Panch Committee) महापालिकडे (Solapur Municipal Corporation) दिला आहे. मात्र, त्यावर अजूनपर्यंत काहीच निर्णय झाला नसून कोरोना तथा ओमिक्रॉनची (Omicron) त्यावेळची परिस्थिती पाहून अंतिम निर्णय होईल, अशी माहिती प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी 'सकाळ'शी (Sakal) बोलताना दिली. (The administration has not yet decided on the Siddheshwar Yatra against the backdrop of Corona)

सिद्धेश्‍वर यात्रा
कोरोना मृतांच्या वारसांसाठी 800 कोटी! जानेवारीत मिळणार मदत

सोलापुरात जानेवारीमध्ये गेल्या 800 ते 900 वर्षांपासून ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांची मोठी यात्रा (गड्डायात्रा) (Gadda Yatra) दरवर्षी भरते. त्यावेळी सोलापूर शहर, जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून आणि कर्नाटक (Karnataka), आंध्र प्रदेशासह (Andhra Pradesh) विविध राज्यांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. श्री सिद्धेश्‍वरांच्या योगदंडाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या विविध समाजांच्या सात नंदीध्वजांचे 12 ते 16 जानेवारीच्या काळात धार्मिक विधी पार पडतात. परंतु, कोरोनामुळे दोन वर्षांपासून साधेपणाने पार पडलेली यात्रा यंदा उत्साहात साजरी करण्यास परवानगी मिळावी, असा प्रस्ताव देवस्थान पंच कमिटीने महापालिका आयुक्‍तांना पाठविला आहे.

राज्य सरकारनेही निर्बंध शिथिल केले असून महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये ग्रामदैवतांच्या यात्रा मोठ्या उत्साहात साजऱ्या होत आहेत. त्याच धर्तीवर यात्रेला परवानगी द्यावी; तसेच यंदाची यात्रा कशा पद्धतीने साजरी करावी, काय निकष असतील, असेही प्रस्तावातून विचारण्यात आले आहे. परंतु, महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर हे सध्या रजेवर असून आयुक्‍तपदाची जबाबदारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे आहे. त्यांनीही अजून निर्णय घेतला नसून कामावर रुजू झाल्यानंतर आयुक्‍त काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांची यात्रा जानेवारीत असते. त्यावेळी कोरोना, ओमिक्रॉनची स्थिती काय असेल, हे आताच निश्‍चितपणे सांगणे कठीण आहे. त्यामुळे सोलापूरसह राज्यातील त्यावेळची परिस्थिती पाहून महापालिका आयुक्‍त अंतिम निर्णय घेतील.

- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्‍त, सोलापूर महापालिका

सिद्धेश्‍वर यात्रा
प्रशासन अन्‌ राजकारणात ब्रॅंड 'बारामती हॉस्टेल'चा!

कोरोनामुळे दोन वर्षे ग्रामदैवताची यात्रा साधेपणानेच साजरी करावी लागली. यंदा मोठ्या उत्साहात यात्रा साजरी करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव महापालिका आयुक्‍तांकडे दिला आहे. 25 डिसेंबरपूर्वी निर्णय अपेक्षित असून त्यानंतर पुढील नियोजन करणे सोयीस्कर होईल.

- धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi), अध्यक्ष, श्री सिद्धेश्‍वर देवस्थान पंच कमिटी, सोलापूर

5 जानेवारीपर्यंत राज्य सरकार घेईल निर्णय?

राज्यातील ओमिक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. 100 टक्‍के लसीकरणही झालेले नाही. त्यामुळे ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वरांची यात्रा उत्साहात साजरी करण्यास परवानगी देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्‍तांकडे विचारणा केली जाईल. त्यानंतर विभागीय आयुक्‍तांकडून तो प्रस्ताव राज्य सरकारकडे जाईल. यात्रेसाठी लाखोंची गर्दी होत असल्याने परवानगीचा निर्णय स्थानिक पातळीवर अशक्‍य आहे. 5 जानेवारीपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातूनच त्यावर अंतिम निर्णय होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.