Barshi
BarshiCanva

दणक्‍यात साजरा झाला बार्शीत 8000 झाडांचा "हॅप्पी बड्डे'!

दणक्‍यात साजरा झाला बार्शीत 8000 झाडांचा "हॅप्पी बड्डे'!
Published on

झाडांच्या बड्डेला रीतसर केक कापला गेला, फुगे लावून झाडांना सजवण्यात आलं. झाडांना "बड्डे बॉय - गर्ल'प्रमाणे सुशोभित आणि झाडांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ - नीटनेटका ठेवण्यात आला.

सोलापूर : जगभर साजरा केला जाणारा वाढदिवस हा व्यक्तिकेंद्रित उत्सव प्रत्येकाला जवळचा वाटतो. दिवसेंदिवस वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये कमालीचे बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाढदिवस साजरा करण्याचा नवनवीन ट्रेंड प्रत्येक वर्षी पाहायला मिळतो. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील पर्यावरणप्रेमी "मॉर्निंग सोशल फाउंडेशन'ने (Morning Social Foundation) त्याच्याही पुढे एक पाऊल टाकलं आहे. बार्शीतील पर्यावरणप्रेमी "मॉर्निंग सोशल फाउंडेशन'ने तब्बल 8000 झाडांचा बड्डे (बर्थडे) (Birthday) साजरा करून नवा फंडा सुरू केला आहे. (The birthday of eight thousand trees was celebrated in a big excitement at Barshi)

Barshi
"फिलॉसॉफी फॉर चिल्ड्रेन'! "चलो थिंक करे'चा शिक्षण क्षेत्रात अभिनव प्रयोग

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील "मॉर्निंग सोशल फाउंडेशन' ही संस्था मागच्या सहा वर्षांपासून झाडं लावण्याचं आणि जगवण्याचं काम करत आहे. या फाउंडेशनमधील जो सदस्य मॉर्निंग वॉकला गैरहजर राहतो त्याला प्रत्येकी 150 रुपयांचा दंड आकारला जातो आणि यातून जमा झालेल्या पैशातून रोपांची खरेदी केली जाते. या फाउंडेशनने याच पैशातून एक पाणी टॅंकर खरेदी केला आहे. या टॅंकरच्या माध्यमातून या झाडांना दररोज पाणी दिलं जातं. प्रत्येक झाड लावत असताना अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने याची लागवड केली जाते.

Barshi
सोलापुरी चादर पाहून भारावला सोनू सूद ! "जय हिंद'ने दिली भेट

आज साजरा करण्यात आलेल्या झाडांच्या बड्डेला रीतसर केक कापला गेला, फुगे लावून झाडांना सजवण्यात आलं. झाडांना "बड्डे बॉय - गर्ल'प्रमाणे सुशोभित आणि झाडांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ - नीटनेटका ठेवण्यात आला. आणि विशेष म्हणजे वाढदिवसाची गाणी सुद्धा या वेळी गाण्यात आली. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे बार्शीला हिरवंगार करण्यासाठी "मॉर्निंग सोशल फाउंडेशन'चे चार ते पाच हजार कार्यकर्ते दररोज झटत आहेत. दरम्यान, आज नवीन 5000 झाडांचं रोपणही या ग्रुपच्या सदस्यांकडून करण्यात आलं. बार्शीतील पर्यावरणप्रेमी तरुणांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे वृक्षसंवर्धन चळवळीला गती मिळण्यास मदत होणार आहे.

बातमीदार : विश्‍वभूषण लिमये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()