कोणत्याही परिस्थितीत 'मकाई'चा हंगाम यशस्वी करणार : दिग्विजय बागल
कोणत्याही परिस्थितीत कारखाना चालू करून यंदाचा हंगाम आम्ही यशस्वी पार पाडू, असा विश्वास दिग्विजय बागल यांनी दिला.
करमाळा (सोलापूर) : श्री मकाई सहकारी साखर कारखाना (Makai Sugar Factory) हा सभासदांचा विश्वास असणारा कारखाना आहे. या कारखान्याने नेहमीच शेतकरी हित जपले आहे. मकाई कारखाना यंदा चालूच होऊ नये म्हणून विरोधकांनी देव पाण्यात ठेवले होते. परंतु, कोणत्याही परिस्थितीत कारखाना चालू करून यंदाचा हंगाम आम्ही यशस्वी पार पाडून दाखवू, असे आश्वासन मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल (Digvijay Bagal) यांनी दिले आहे. ते कारखान्याच्या 20 व्या बॉयलर पूजन प्रसंगी बोलत होते. कारखान्याच्या 20 व्या बॉयलरचे पूजन कारखान्याचे उपाध्यक्ष ऍड. ज्ञानदेव देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
दिग्विजय बागल पुढे म्हणाले, यंदा आम्ही साडेतीन लाख ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखाना व्यवस्थित चालवण्यासाठीचे सर्व नियोजन केले आहे. आम्ही कठीण परिस्थितीत कारखाना चालू करून यशस्वीपणे हा गळीत हंगाम पार पाडणार आहोत. यावर्षी मकाईच्या सभासदांसाठी 25 किलो साखर 31 रुपये किलो या भावाने उपलब्ध करून देत आहोत. कार्यक्षेत्रातील सर्व ऊस आपल्या कारखान्याकडे गाळप करण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन ऍड. ज्ञानदेव देवकर यांनी मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे यांनी प्रास्ताविक केले तर आभार संचालक संतोष देशमुख यांनी मानले. या वेळी संचालक बाळासाहेब पांढरे, बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप, महादेव गुंजाळ, नंदकुमार भोसले, महादेव सरडे, संतोष देशमुख, सुनील लोखंडे, दत्तात्रय गायकवाड, संतोष पाटील, गोकूळ नलवडे, बापू कदम, बाळासाहेब सरडे, रघुनाथ फडतरे, माजी संचालक काशिनाथ काकडे यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी सभासद उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.