...अन्यथा औषधांची दुकाने बंद करावी लागतील !

बार्शी येथील केमिस्ट असोसिएशनचा इशारा
chemist
chemist
Updated on
Summary

कोविड महामारीत अग्रक्रमाने काम करणाऱ्याच्या यादीत कोविडयोद्धा म्हणून औषधी विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने संपूर्णतः दुर्लक्ष केले आहे.

बार्शी (सोलापूर) : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोविड (Covid) प्रादुर्भावाची पहिली लाट ओसरुन दुसऱ्या लाटेला आपण सर्वजण सामोरे जात आहोत. सर्वांसोबत औषध विक्रेतेही (Drug dealers) स्वतःची पर्वा न करता रुग्णांना औषधांचा पुरवठा (Supply of medicines) करीत आहेत. पण शहर व तालुक्‍यातील औषध विक्रेत्यांना, त्यांच्या कुटुंबांना लस पुरवठा (Vaccine supply) होऊ शकला नाही. या निषेधार्थ नाईलाजाने आम्हास औषध दुकाने (Drug stores) बंद करावी लागतील, असा इशारा केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट (Chemist and druggist) संघटनेने दिला आहे. तहसीलदार व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना संघटनेने निवेदन दिले. (The chemists association has warned to close drug stores in Solapur district due to non supply of vaccines to drug dealers)

chemist
बार्शी शहर अन्‌ तालुका "कोरोना हॉट स्पॉट'च्या दिशेने ! 

कोविड महामारीत अग्रक्रमाने काम करणाऱ्याच्या यादीत कोविडयोद्धा म्हणून औषधी विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने संपूर्णतः दुर्लक्ष केले आहे. लसीकरण कार्यक्रम सुरु झाला, औषध विक्रेता तेथील कर्मचारी जीवावर उदार होऊन 24 तास सेवा देत आहेत. देशासह राज्यात औषधी पुरवठा सुरळीत राहण्यात मोठी मदत झालेली आहे. औषधी विक्रेत्यांचा प्रत्यक्ष संबंध कोविड रुग्ण अथवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांशी जवळून येतो. त्यात दुष्परिणामांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्‍यता नाकारता येत नाही.

chemist
पंढरपूर, बार्शी, करमाळ्यात रेमडेसिव्हिरची वाढली मागणी ! सध्या अकराशे इंजेक्‍शनचाच साठा

महाराष्ट्रासह देशात 200 पेक्षा अधिक औषध विक्रेते कोरोनाचे बळी पडले असून एक हजारच्या जवळपास परिवारातील त्यांचे नातेवाईक बाधित झालेले आहेत. असे असूनही केंद्र, राज्य सरकारने कोविड योद्धा म्हणून सन्मान तर दिला नाहीच. परंतु साधे लसीकरणात प्राधान्य देण्याचे औदार्य देखील दाखवले नाही. याची खंत सर्व औषधी विक्रेते, कर्मचाऱ्यांच्या मनात असून सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. संघटनेने वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराचीही दखल शासनाने घेतली नाही.

chemist
उस्मानाबादच्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, इंजेक्शन मिळेना; उपचारासाठी गाठावे लागते बार्शी अन् सोलापूर

शासनाची भूमिका अशीच राहिल्यास सभासदांचा वाढता दबाव लक्षात घेता संघटनेला संपूर्ण लॉकडाउनमध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. शासनाने गंभीर दखल घ्यावी. अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव व्यवसाय बंदची भूमिका घ्यावी लागेल. असा इशारा अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी तसेच बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर राऊत, अभिजीत गाढवे, मोइज काझी, गणेश बारसकर, हेमंत गांधी यांनी दिला आहे. (The chemists association has warned to close drug stores in Solapur district due to non supply of vaccines to drug dealers)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.