ग्रामीण भागातही वाढली जातिवंत श्वानांची क्रेझ !

ग्रामीण भागातही वाढली जातिवंत श्वानांची क्रेझ !
ग्रामीण भागातही वाढली जातिवंत श्वानांची क्रेझ !
ग्रामीण भागातही वाढली जातिवंत श्वानांची क्रेझ !Canva
Updated on
Summary

अगदी नोकरदारांपासून ते सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत श्वानप्रेमींची क्रेझ वाढली आहे.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : एखाद्या माणसाला कुणीच विचारत नसेल तर त्याला कुत्रासुद्धा विचारत नाही, असे म्हणायची पद्धत आहे. परंतु, सध्या ग्रामीण भागात याच कुत्र्यांना मोठी किंमत आली आहे. अगदी नोकरदारांपासून ते सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत श्वानप्रेमींची क्रेझ वाढली असून, वेगवेगळ्या जातींचे श्वान सोलापुरातील ग्रामीण भागात (Rural area of Solapur) दिसून येत आहेत. यातून आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात होत आहे.

ग्रामीण भागातही वाढली जातिवंत श्वानांची क्रेझ !
लस घेतली अन्‌ अँटिजेन टेस्ट केली तरी कर्नाटकमध्ये नो एंट्री !

श्वान हा प्राणी माणसाचा खास मित्र म्हणून पूर्वीपासूनच परिचित आहे. अजूनही बैठ्या घरांमध्ये श्वान असणे हे कुटुंबातील एक भाग समजला जातो. त्यामुळे शहरी भागात भारतीय जातींच्या श्वानांपेक्षा विदेशी जातीच्या श्वानांना अधिक महत्त्व दिले जाते. सध्या बदलत्या काळात तर श्वान घरात पाळणे एक स्टेटस समजले जात आहे. या शहरी संस्कृतीचे अनुकरण ग्रामीण भागात देखील पसरले असून, शेतवस्तीसाठी, घराच्या राखणदारीसाठी गावरान श्वान पाळले जातात. परंतु, अलीकडे ग्रामीण भागात देखील विविध जातिवंत श्वानांना मागणी वाढली आहे. लांबसडक, उंच तसेच आकर्षक श्वान पाळण्याची युवकांमध्ये प्रचंड क्रेझ दिसून येत आहे.

या श्वानप्रेमींना यातून रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत. विविध जातिवंत श्वानांच्या किमती जवळपास 15 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंत आहेत. सध्या ग्रामीण भागात रक्षण आणि शोभेसाठी उंची जातीचे श्‍वान संगोपन होत असून, वास घेण्यात पटाईत असलेले जर्मन शेपर्ड, लॅब्रोडोर किंवा डॉबरमॅन, ग्रेहाउंड आदींना मागणी जास्त आहे. या श्वानांचा देखभाल मासिक खर्च हा दोन ते तीन हजार इतका असून देखील श्वानप्रेमींची संख्या वाढत आहे. या श्वानांच्या शर्यतीदेखील भरवल्या जात असून यातून श्वानमालकांना बक्षिसेही मिळत आहेत. एकंदरीत, गावरान श्वानांपेक्षा विदेशी विविध जातीचे श्वान पाळण्यासाठी व देखभालीसाठी युवक धडपड करताना दिसत आहेत.

ग्रामीण भागातही वाढली जातिवंत श्वानांची क्रेझ !
वादग्रस्त विधानाने अडगळीतील ढोबळे पुन्हा चर्चेत ! शिंदे म्हणाले...

जातिवंत श्वान सांभाळण्यात एक वेगळीच मज्जा आहे. हे श्वान म्हणजे मित्रापेक्षा कमी नाहीत. यांची देखभाल व्यवस्थितरीत्या केल्यास हे अधिक आकर्षक दिसतात. मी स्वतः हौस म्हणून श्वान पाळत आहे.

- दत्तात्रय वाघमारे, श्वानप्रेमी

लहानांपासून जातिवंत श्वान पाळण्याची आवड आहे. त्यामुळे आतापर्यंत वेगवेगळ्या जातींची श्वान सांभाळली आहेत. शेतातील वस्तीला रक्षणासाठी या श्वानांचा चांगला उपयोग होत आहे.

- शिवदत्त भोसले, श्वानप्रेमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.