जिल्हा परिषद, पंचायत समिती अन् नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेती...
जिल्हा परिषद (Solapur ZP), पंचायत समिती अन् नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुकांचे (Elections) पडघम वाजू लागलेती... विलेक्शनचं वारं आलं की सगळ्याच पक्षात अंतर्गत बंडाळी सुरू झालीया... सोलापुरातबी (Solapur) कुणी काय कमी नाय! कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (Shiv Sena) अन् भाजपमदीबी (BJP) असलं गुऱ्हाळ चालूच हाय... हामीबी लईच हुशार... प्रत्येक पक्षात काय चाललंया हे पाहण्यासाठी चारही पक्षात डोस्कावून आलो... सगळीकडंच चित्र बघून 'ये क्या हो रहा है' असंच वाटू लागलंय... (The current situation in politics across the district has become very strange)
अक्कलकोटमदी (Akkalkot) सचिनदादा आमदार होण्यापूर्वी अन् झाल्यानंतरबी भाजपमदी आनंदअण्णा त्येंचा दुस्वास करत्याती, हे काय नवं नाय... परवाच गुरववाडीत बोलताना दादाला जरा जास्तच "इगो' झालंय म्हटलं... हिथं भाजपमदी नेहमीच दोन गट आपापसात कुरघोडी करत्यात हेबी काय नवं नाय... ही परंपराच हाय... बाबासायब नंतर महानंदाताई हुभारले हुते तवाबी पंचप्पण्णानी लावलेला सुरुंग सगळ्यांना आठवतोय... आता फकस्त पलटी झालंया... भाजपमधलं कुणीतरी सिद्धूअण्णाकडं झुकलेलं असतंया... अण्णा तेवढं तयारीचंच हाय म्हणा ! तवा बाबासायबांनी अन् आता दादानं इरोधकांना अस्मान दाखवलं... जिल्हा परिषद विलेक्शनमदी आपल्याला तिकीट मिळणार नसल्याचं सपान आनंदअण्णाला पडू लागल्यानं त्येंनी आतापासूनच सिद्धूअण्णाच्या छत्रछायेखाली आसरा घेण्याची तयारी सुरु केल्याचं दिसू लागलंया...
राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळी काय कमी नाय... नरखेडकर अन् अनगरकर यांच्यात इस्तू आडवा जात नाय... शिव्यांच्या पुस्तकावरनं आता रणकंदन सुरु हाय... मोठ्ठ सायब अन् दादा दोन्ही डगरीवर पाय ठेवूनशान सगळं बघत राह्यत्यात... नरखेडकर दिवसेंदिवस अनगरकरांवर शरसंधान करु लागल्याती... कोणताही इव्हेंट असू दे त्ये अनगरकरांवर तोफ डागत्यातीच... अनगरकरबी काय कच्च्या गुरुचे चेले नायती... त्येबी त्यांना उत्तर देत्यात... पण नरखेडकर सुरु करत्यात अन् अनगरकर नुसत्या उत्तरावर समाधान मानत्यात... मोठ्या सायबांच्या उपस्थितीत हुतात्मामदीबी अनगरकरांवर अप्रत्यक्षपणे नरखेडकरांनी हाणलेला सणसणीत टोला आम्हास्नी आजबी आठवतुया... मोहोळ तालुक्यात तर याचा आनंद सगळेच घेऊ लागलेती... समोर जिल्हा परिषद निवडणुकीचं घोडा मैदान हाय... इधान परिषदबी लागल... आतापतूर तीनवेळा पक्षानं लादलेला उमेदवार अनगरकरांनी निवडून आणण्याची किमया केल्याचं त्ये सांगत्यात... त्यांची ताकद लईच मोठी हाय... त्येंना इधान परिषदेचं तिकीट देऊन मोठ्या सायबानी त्येंच्या त्यागाची दखल घ्यावी असंच वाटू लागलंया...
सोलापुरात सेनेचंबी असंच हाय... गेल्या वक्ताला आठ मेंबर निवडून आल्तं... महेशअण्णा सेनेत आलं अन् 21 मेंबर झालं... पक्ष संघटनेत बरडेसायबाचंच चालत हुतं असं लक्षात आल्यावर मध्यमदी सेनेची उमेदवारी मिळाली नसल्यानं अण्णानं साटंलोटं करून निवडणूक लढविली... तवा दिलीपमालकाचा हकनाक बळी गेला... सायबाची खेळी कुणालाबी कळली नाय... आता महेशअण्णा राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर हायती... त्येंच्यामुळे राष्ट्रवादीचं मेंबर जास्त येत्याल असं सपान नेत्यांना पडू लागलया... परंतु खरं काय हुईल हे निकालानंतरच समजेल, असं शिवसैनिक बोलू लागल्याती... अण्णा परस्पर सेनेतनं गेल्यानं बरडेसायबाचं पक्षातलं स्थान अजून बळकट झालंया म्हणत्यात...
कॉंग्रेसचं शहराध्यक्ष अन् कार्यकर्ते सगळेच सैरभर झालेती... प्रकाशअण्णा इरोधात नेहमीच बंडाळीचं निशाण फडकावलं जातया... पण अण्णा लईच चिवट... कोरोनानंतरच्या कार्यकर्त्यांकडून करुन घेतलेल्या सत्कारामुळे त्यांचं पद पुन्हा शाबूत राह्यलं... जिल्हाध्यक्ष बदलला मातूर अण्णाचं पद काय जात नाय असं समजल्यानंतरबी सुनीलभाऊ थोडं शांत झाले... परंतु राजनकाका अजूकबी प्रयत्न करत्याती... त्यांच्याप्रमाणंच सुप्तपणे अजूक काही कार्यकर्ते काड्या करत्यातीच... पण विलेक्शनच्या वक्ताला समाज पाठीशी पाह्यजे म्हणूनशान सायब शांतच हायती..!
- सोन्याबापू आगलावे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.