'डीसीसी'ने शिक्षकांसाठी वाढविली कर्ज मर्यादा! वेतनावर 40 लाखांचे कर्ज

'डीसीसी'ने शिक्षकांसाठी वाढविली कर्ज मर्यादा! वेतनावर 40 लाखांचे कर्ज
Updated on
Summary

जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक हे बॅंकेचे नियमित खातेदार राहावेत, यादृष्टीने बॅंकेने त्यांच्यासाठी सुविधा वाढविल्या आहेत.

सोलापूर : राष्ट्रीयकृत बॅंकांशी (Nationalized Bank) स्पर्धा करीत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक (Solapur District Central Bank) शंभर वर्षांपासून खंबीरपणे शेतकरी, शिक्षक, उद्योजकांच्या पाठिशी उभी आहे. जिल्हा बॅंकेतून शिक्षक खातेदारांची संख्या कमी होऊ नये म्हणून आता शिक्षकांसाठी 40 लाखांपर्यंत मध्यम मुदतीचे कर्ज देण्याचे धोरण निश्‍चित केले आहे. ज्या खातेदाराचे व्यवहार चांगले आहेत, त्यांना एका दिवसात कर्ज (Debt) मिळेल, अशी माहिती बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी दिली. (the district central bank will now provide medium term loans of up to Rs 40 lakh for teachers)

'डीसीसी'ने शिक्षकांसाठी वाढविली कर्ज मर्यादा! वेतनावर 40 लाखांचे कर्ज
अकरा हजार डोसचे दीड तासात बुकिंग! 94 केंद्रांवरून आज लसीकरण

अनियमित कर्जवाटपामुळे अडचणीत आलेली बॅंक आता पूर्वपदावर येण्यासाठी धडपडत आहे. बॅंकेने शेती कर्जासोबतच आता गावोगावी मायक्रो फायनान्स द्यायला सुरू केले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक हे बॅंकेचे नियमित खातेदार राहावेत, यादृष्टीने बॅंकेने त्यांच्यासाठी सुविधा वाढविल्या आहेत. शिक्षकांसाठी एटीएम, मायक्रो एटीएम, एसएमएस, पगारावर ओव्हर ड्राप्ट, सिबिल उत्तम असल्यास एका दिवसात मागेल तेवढे कर्ज, सेवानिृत्तीला एक-दोन वर्षे राहिलेल्या शिक्षकांनाही कर्ज, 15 वर्षांच्या मुदतीवर हौसिंग लोन (अडीच वर्षांनंतर टॉपअप) अशा विविध सुविधा बॅंकेने सुरू केल्या आहेत.

'डीसीसी'ने शिक्षकांसाठी वाढविली कर्ज मर्यादा! वेतनावर 40 लाखांचे कर्ज
'वित्त'च्या परवानगीविना शिक्षक भरती! 34 हजार शिक्षकांचे अडकले वेतन

तसेच बॅंकेच्या 208 शाखांमध्ये मायक्रो एटीएमद्वारे पैसे काढणे, एलआयसी हप्ता भरणे, मोबाईल रिचार्ज, वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पगाराला विलंब झाल्यास त्यांच्या कर्जावरील व्याज वाढू नये, त्यांचे सिबिल खराब होऊ नये म्हणून पगाराएवढाच ओव्हर ड्राप्ट दिला जात असल्याचेही कोथमिरे यांनी यावेळी सांगितले.

'डीसीसी'ने शिक्षकांसाठी वाढविली कर्ज मर्यादा! वेतनावर 40 लाखांचे कर्ज
'या' पंचसुत्रीमुळेच कमी झाली दुसरी लाट! सोलापूर कोरोनामुक्‍तीकडे

शंभर वर्षांची परंपरा जपत बॅंकेने आता अडचणीतून मार्ग काढला आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांच्या धर्तीवर आता कर्जदारांना कर्ज देण्यापूर्वी त्यांचे पूर्वीचे व्यवहार (सिबिल) पडताळून, त्यांना लागेल तेवढे कर्ज (25 ते 40 लाखांपर्यंत) दिले जात आहे. 25 लाखांपर्यंत शाखा स्तरावर तर त्यावरील रकमेसाठी मुख्य शाखेची परवानगी घ्यावी लागते.

- शैलेश कोथमिरे, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सोलापूर

'डीसीसी'ने शिक्षकांसाठी वाढविली कर्ज मर्यादा! वेतनावर 40 लाखांचे कर्ज
सोलापूर आगारातून केवळ तीन रातराणीच्या फे-या सुरु

"सिबिल'मुळे कर्जवाटप सुरक्षित

कर्ज मागणी करणाऱ्या खातेदाराचे यापूर्वीचे व्यवहार कसे आहेत, तो त्याच्याकडील कर्जाचे हप्ते नियमित भरतो का, किती विलंब करतो, याची राष्ट्रीयकृत बॅंका पडताळणी करतात. त्यातून संबंधिताचे व्यवहार समजतात आणि तो बॅंकेकडून घेतलेले कर्ज परतफेड करू शकतो का, याची खात्री होते. त्यासाठी जिल्हा बॅंकेने क्रेडिट रेटिंग कंपनी, एक्‍सिपेरियन अशा चार कंपन्यांसोबत करार केला आहे. किमान 650 ते 700 पर्यंत स्कोअर बॅंकेने निश्‍चित केला असून अशा खातेदाराला एका दिवसांत कर्ज दिले जाते, असेही कोथमिरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

'डीसीसी'ने शिक्षकांसाठी वाढविली कर्ज मर्यादा! वेतनावर 40 लाखांचे कर्ज
दिलासादायक! सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख रुग्णांनी कोरोनाला हरविले

सहाशेरूपयांत 35 लाखांचा अपघाती विमा

पगारदार नोकरदारांना जिल्हा बॅंकेने अपघाती विम्याची सोय करून दिली आहे. वार्षिक हप्ता सहाशे रूपये असून त्या हप्त्यात 35 लाखांचा विमा उतरविला जातो. शेतकरी हा बॅंकेचा मुख्य घटक असून शिक्षकांसह लहान-मोठ्या उद्योगांसाठीही बॅंकेने कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विविध सुविधांमुळे शिक्षक, शेतकरी वर्ग पुन्हा बॅंकेकडे येऊ लागला आहे.(the district central bank will now provide medium term loans of up to Rs 40 lakh for teachers)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.