'उत्तर'च्या सभापती निवडीची उत्सुकता! 8 नोव्हेंबरला होणार निवड

'उत्तर'च्या सभापती निवडीची उत्सुकता! 8 नोव्हेंबरला होणार निवड
'उत्तर'च्या सभापती निवडीची उत्सुकता! 8 नोव्हेंबरला होणार निवड
'उत्तर'च्या सभापती निवडीची उत्सुकता! 8 नोव्हेंबरला होणार निवडSakal
Updated on
Summary

उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी जाहीर केला आहे.

उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुका (North Solapur Taluka) पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम (Hemant Nikam) यांनी जाहीर केला आहे. येत्या 8 नोव्हेंबरला दुपारी एक वाजता पंचायत समितीच्या सभागृहात सभापती पदाची निवड होणार आहे. पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे (Rajani Bhadkumbe) यांच्या विरोधात अविश्वास ठराव नुकताच मंजूर झाला आहे. त्यानंतर आता नव्या सभापती निवडीचा कार्यक्रम प्रांताधिकारी निकम यांनी जाहीर केला आहे. दरम्यान, आपल्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव रद्द व्हावा, याबाबतची याचिका सभापती भडकुंबे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यापूर्वीच उपसभापती जितेंद्र शीलवंत यांनीही न्यायालयात कॅव्हेट दाखल केले असल्याची चर्चा तालुक्‍यात सुरू आहे.

'उत्तर'च्या सभापती निवडीची उत्सुकता! 8 नोव्हेंबरला होणार निवड
शेतकऱ्यांची दिवाळी गोड! भीमा कारखान्याने दिली शंभर टक्के एफआरपी

प्रांताधिकारी निकम यांनी सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याबाबत तालुक्‍यात उत्सुकता निर्माण झाली आहे. माजी आमदार दिलीप माने गटाचे हरिदास शिंदे, राष्ट्रवादीचे उपसभापती जितेंद्र शीलवंत, भाजपच्या संध्याराणी पवार यांनी एकत्र येत सभापती भडकुंबे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. तो ठराव रद्द करण्याची मागणी भडकुंबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र त्यांनी भडकुंबे यांच्या मागणीला फारसं महत्त्व दिलं नाही. त्यानंतर त्यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर तो रद्द करावा, यासाठी भडकुंबे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत हा विषय अडकतो, की 8 नोव्हेंबरला नव्या सभापतीची निवड होते, याबाबत उत्सुकता लागली आहे.

आज न्यायालयात सुनावणी

भडकुंबे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याबाबत न्यायालयामध्ये आज (शुक्रवारी) या विषयी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले जाण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर न्यायालय काय निर्णय देते, याकडेही तालुक्‍याचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.