130 कोटींच्या घोळात थांबली 450 कोटींची सोलापूर-उजनी दुहेरी पाइपलाइन !

सोलापूर ते उजनी पाइपलाइनच्या कामासाठी अंदाजित रक्कम वाढली
Ujani Pipeline
Ujani PipelineMedia Gallery
Updated on
Summary

130 कोटींच्या घोळात थांबली 450 कोटींची सोलापूर-उजनी दुहेरी पाइपलाइन ! शेती नुकसानीची रक्कम 75 कोटींनी वाढली; अजितदादांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली कमिटी

सोलापूर : सोलापूर- उजनी पाइपलाइनचे (Solapur-Ujani pipeline) काम करताना उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा या तालुक्‍यांतील 117 शेतकऱ्यांना अंदाजित 55 कोटींची नुकसान भरपाई द्यावी लागेल, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्‍त केला. मात्र, प्रत्यक्षात सर्व्हे झाल्यानंतर नुकसानीची रक्‍कम 130 कोटींवर पोचली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी रक्‍कम कशी वाढली, याची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार समिती नियुक्‍त केली असून त्याचा अहवाल अजूनही आला नसल्याने 450 कोटींच्या दुहेरी पाइपलाइनचे काम थांबले आहे. (The estimated amount for the work of Solapur to Ujani pipeline increased)

Ujani Pipeline
शहर-जिल्ह्यात काय चालू व काय बंद ! वाचा सविस्तर

शहराचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सुटावा या हेतूने सोलापूर-उजनी अशी दुहेरी पाइपलाइन टाकण्याचा निर्णय झाला. स्मार्ट सिटीतून (Smart City) हे काम सुरू असून सोलापूर ते उजनीपर्यंत 110 किलोमीटर अशी पाइपलाइन आहे. या कामाची मुदत फेब्रुवारी 2022 रोजी संपणार आहे. मुदत संपायला आता नऊ महिन्यांचा अवधी शिल्लक असून, आतापर्यंत केवळ 15 किलोमीटरपर्यंतच काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण होण्यासाठी आणखी किमान दीड वर्षाचा कालावधी लागेल, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सोलापूरकरांना नियमित व सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, त्या मक्‍तेदाराची भूमिका फार महत्त्वाची असून, विलंबामुळे त्याने अधिक रकमेची मागणी केल्यास पुन्हा पाइपलाइनचे बजेट वाढू शकते, असाही अंदाज वर्तविला जात आहे.

Ujani Pipeline
बापमाणूस! मुलाच्या क्रिकेट मैदानासाठी दिली पाच एकरची द्राक्षबाग

"या' बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची पडताळणी

बसेवश्‍वर नगर व देगाव येथील प्रत्येकी दोन, मोहोळमधील खंडाळी, शेटफळमधील प्रत्येकी एक, माढा तालुक्‍यातील आढेगाव पाच, अकुंभेतील सहा, अरणमधील 29, भोईंजेतील सहा, मोडनिबंमधील 11, सापटणे टें. येथील 12, शिराळे टें. येथील 13, वरवडेतील 15 आणि वेणेगाव येथील 14 बाधित शेतकऱ्यांना पाइपलाइनची नुकसान भरपाई मिळणार आहे. सुरवातीला त्यांचा प्राथमिक सर्व्हे झाल्यानंतर अंदाजित 55 कोटींपर्यंत भरपाई द्यावी लागेल, असा अंदाज होता. मात्र, त्या ठिकाणी झाडी, फळबागा वाढल्याने ही रक्‍कम वाढल्याचे सांगण्यात आले. आता त्याची पडताळणी कृषी, महसूलच्या समितीमार्फत केली जाणार आहे.

ऑक्‍सिजनमुळेही थांबले काम...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने उद्योगांसाठी दिलेला ऑक्‍सिजन बंद करून आरोग्यासाठी वापरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे पाइप कटिंग व जोडण्यासाठी लागणारा ऑक्‍सिजन बंद झाला. त्यामुळे दुहेरी पाइपलाइनचे काम थांबले आहे. पर्याय शोधून काम सुरू केले जात असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे अभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली. शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळाल्यानंतर विनाअडथळा काम होईल, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()