Solapur : परीक्षा 200 गुणांची, पण गुण त्याहून जास्त! तलाठी पेपरच्या सामान्यीकरणामधील प्रकार

राज्य सरकारने तलाठी भरतीची परीक्षा (टीसीएस - आय.टी) कंपनीमार्फत घेतली होती. यासाठी राज्यातील १३ लाख उमदेवरांनी अर्ज भरले होते. तलाठी परीक्षेला राज्यातून जवळपास ११ लाख उमेदवाराने परीक्षा दिली होती.
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : तलाठी पेपरफुटी संदर्भात अगोदरच वातावरण तापलेले असताना आता या तलाठी भरतीच्या निकालातील त्रुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तलाठी परीक्षा 200 गुणांची आणि निकालाच्या सामान्यीकरणमध्ये त्याहून अधिक गुण उमेदवारांना मिळाल्याची बाब दिसत आहे.

राज्य सरकारने तलाठी भरतीची परीक्षा (टीसीएस - आय.टी) कंपनीमार्फत घेतली होती. यासाठी राज्यातील १३ लाख उमदेवरांनी अर्ज भरले होते. तलाठी परीक्षेला राज्यातून जवळपास ११ लाख उमेदवाराने परीक्षा दिली होती. तलाठी परीक्षा सुरू असताना अनेक जिल्ह्यांमध्ये काही उमेदवार तेथील संबंधित कर्मचाऱ्यांच्या मदतीने हायटेक कॉपी करताना सापडले आहेत. या संदर्भात जिल्हास्तरावर पुरावे सादर केले गेले. काही घोटाळेबाजाना अटकसुद्धा करण्यात आली होती.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन संघटना उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व विभागाच्या परीक्षा घेण्यासाठी (आयबीपीएस) व (टीसीएस) या आयटी कंपन्यांना स्वायत्तता देण्यात आली आहे. परंतु आयबीपीएस कंपनीमार्फत घेतल्या जाणाऱ्या अनेक विभागाच्या परीक्षेचे नॉर्मलायझेशन केले जात नाही. परंतु टीसीएस या आयटी कंपनीमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे नॉर्मलिझेशन करण्यात येते.

एकाच राज्यात विविध विभागातील परीक्षेचे नॉर्मलेशन होते किंवा काही विभागाचे होत नाही, असा महाराष्ट्र राज्यात दुजाभाव का केला जात आहे याचे उत्तर मिळालेले नाही. ह्या गोष्टीचाही लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका येत आहे. परंतु नॉर्मलायझेशन म्हणजे सरासरी गुण (सामान्यीकरण) जे की त्या दिवसाच्या पेपरचे कठीण पातळीवर अवलंबून असते. काही विद्यार्थ्यांचे गुण वाढू शकतात आणि काही विद्यार्थ्यांचे गुण कमी होऊ शकतात.

परंतु, परीक्षा दोनशे गुणांची असताना राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण कसे काय मिळू शकतात? हा अजब प्रकार आता समोर आला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने वारंवार तलाठी पेपर घोटाळे संदर्भात माहिती पुरवली होती. २०१९ च्या तलाठी पेपर घोटाळा संदर्भात पुराव्यासह सादर केले. शासनाकडे पाठपुरावा करून त्यासाठी शासनाने विशेष (एसआयटी) नेमावी, या साठी खुप प्रयत्न केले आहे. त्याचेही अद्याप अहवाल येणे बाकी असताना आता २०२३च्या तलाठी पेपरमध्ये अनेक घोटाळाबाज लोक सापडले होते. या संदर्भात अनेक पुरावेही सादर करण्यात आले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले आणि परीक्षा घाईघाईने घेण्यात आली. त्यामुळे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने महाराष्ट्रातील होतकरू व प्रामाणिक उमेदवारांच्या हिताचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयात तलाठी परीक्षा संदर्भात याचिका दाखल केली होती.

तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. मुळातच तलाठी परीक्षा २०० गुणांची परीक्षा असताना टीसीएस कंपनीने जाहीर केलेल्या यादीनुसार राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. मुळातच ही परीक्षा २०० गुणांची असून नॉर्मलायझेशन म्हणजे सामान्यीकरण जरी केले गेले, तरीही २०० पेक्षा जास्त गुण कसे मिळू शकतात. हा प्रकार म्हणजे परीक्षा यंत्रणेवर संशय असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन परत तलाठी पेपर तपासून यादी जाहीर करावी. अन्यथा आम्हास उच्च न्यायालयात जावा लागेल.

- प्रशांत शिरगुर, प्रवक्ता तथा उपाध्यक्ष सोलापूर, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.