आग्या मोहोळ स्थलांतराचा अफलातून प्रयोग ! हजारो मधमाशांचे वाचले प्राण

सोलापुरात मधमाशांचे पोळे स्थलांतर करण्याचा प्रयोग यशस्वी झाला
bee hives
bee hivesCanva
Updated on
Summary

बॉक्‍स उघडताना या मधमाशा चवताळतील अशी शंका होती. अलगद एका बाजूचे झाकण उघडल्यानंतर त्यातल्या मधमाशा बाहेर आल्या व घोंघावत परिसराचा अंदाज घेऊ लागल्या...

सोलापूर : शहरातील एका बांधकामावरील आग्या मोहोळाचे पोळे (bee hives) येथील नेचर कॉन्झर्व्हेशनच्या (Nature Conservation Circle) सदस्यांनी सुरक्षितपणे हलवत त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा प्रयोग यशस्वी केला. त्यामुळे आग्या मोहोळातील हजारो मधमाशांचे (Honey Bees) प्राण वाचले. (The experiment of migrating bee hives in Solapur was successful)

bee hives
"उजनी'चा आदेश रद्द करण्याचे श्रेय शरद पवार व शेतकऱ्यांनाच !

शहरातील उद्योजक पूर्णचंद्रराव यांच्या बांधकाम चालू असलेल्या घरामध्ये तिसऱ्या मजल्यावर मधमाशांचे पोळे असल्याची माहिती नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांना मिळाली. घराचे काम चालू असताना कामगारांच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. तेव्हा नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे सदस्य पप्पू जमादार, भारत छेडा, धनंजय काकडे व कृष्णा थोरात व मानद वन्यजीव रक्षक हे रेस्क्‍यू करण्यासाठी निघाले. आतापर्यंत जेथेही मधमाशांचे पोळे असते तिथे जाळ - धूर करून किंवा केमिकलने त्या मधमाशांवर फवारणी करून मारले जाते किंवा पळवले जाते.

bee hives
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती !

बांधकामाची घाई लक्षात घेता पेस्ट कंट्रोल करून ते पोळे काढले तर सगळ्या मधमाशा मारल्या जातात. तिथे पोळे लागलेल्या जागेला जाळले जाते. तेव्हा सदस्यांनी कामाला सुरवात केली. तिथेच पुठ्ठ्याचा बॉक्‍स मिळाला, जो पोळ्यापेक्षा साईजने मोठा होता. सन्माईकचा तुकडा, लोखंडी सळई व पेपर टेप आदी वस्तूंचा वापर करत तयारी चालू केली. छताला लागलेल्या पोळ्याला अलगदरीत्या पुठ्ठ्याच्या बॉक्‍सने झाकून घेण्यात आले. लोखंडी सळईच्या साहाय्याने बॉक्‍समध्ये पोळ्याला आधार देत अगदी हळूहळू त्या पोळ्याला छतापासून वेगळे केले तेही मधमाशांसह.

पोळे बॉक्‍समध्ये अलगद पडले आणि मधमाशा आतल्या आत घोंगावू लागल्या. समयसूचकता पाळत तो बॉक्‍स तसाच छताला धरून ठेवल्याने मधमाशा शांत झाल्या. काही वेळाने तो बॉक्‍स खाली घेऊन पेपर टेप लावून व्यवस्थित बंदिस्त केल्यानंतर हवेसाठी बारीक छिद्र केले. तत्काळ तो बॉक्‍स वनपरिमंडल अधिकारी शंकर कुताटे यांच्या सहकार्याने सिद्धेश्वर वन विहारात बांबूच्या झोपडीत थंड ठिकाणी मधमाशा शांत होण्याकरिता रात्रभर ठेवला. नंतर वन विहारात असलेल्या उंच पाण्याच्या टाकीखाली थंड ठिकाणी तो पोळे असलेला बॉक्‍स हलवण्यात आला. अर्धा तास थांबून मधमाशांना शांत होऊ दिले गेले. बॉक्‍स उघडताना या मधमाशा चवताळतील अशी शंका होती. अलगद एका बाजूचे झाकण उघडल्यानंतर त्यातल्या मधमाशा बाहेर आल्या व घोंघावत परिसराचा अंदाज घेऊ लागल्या. दुसऱ्या दिवशी या मधमाशा पन्नास मीटर अंतरावर एका उंच झाडाच्या फांदीला पोळं बनवत असल्याचे निदर्शनास आले.

ठळक बाबी

  • आग्या मोहोळाच्या मधमाशा हल्ला करण्याचा गैरसमज दूर

  • पोळे सुरक्षितपणे मधमाशांसह दुसरीकडे हलवले जाऊ शकते

  • स्थलांतरणानंतर मधमाशा स्वतः परिसरात नव्या जागेचा शोध घेतात

  • पोळे काढताना मधमाशांना शांत होऊ देण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.