वडिलांनी ज्यूस बार चालविले, पण मुलाला 'आयपीएस' बनविलेच!

तिसरी शिकलेल्या वडिलांनी ज्यूस बार चालविले, पण मुलाला 'आयपीएस' बनविलेच!
तिसरी शिकलेल्या वडिलांनी ज्यूस बार चालविले, पण मुलाला 'आयपीएस' बनविलेच!
तिसरी शिकलेल्या वडिलांनी ज्यूस बार चालविले, पण मुलाला 'आयपीएस' बनविलेच!Canva
Updated on
Summary

वडील उत्तमराव झेंडे यांनी तिसरीतून शिक्षणाला रामराम केला आणि मिळेल ते काम करायला सुरवात केली.

सोलापूर : 1990 च्या दशकात कुटुंबाची परिस्थिती बेताची होती. वडिलांना चार बहिणी व तीन भाऊ असल्याने कुटुंबाचा पसारा मोठा होता. काहीतरी व्यवसाय, मिळेल ते काम केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे वडील उत्तमराव झेंडे (Uttamrao Zende) यांनी तिसरीतून शिक्षणाला रामराम केला आणि मिळेल ते काम करायला सुरवात केली. 1991 मध्ये त्यांनी दिवे (जि. पुणे) (Pune) परिसरात ज्यूस बार, आईस्क्रीम बार सुरू केला. त्यातून येणाऱ्या पैशातून त्यांनी मुलांचे शिक्षण अन्‌ कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविला. मुलगा अतुल (Atul Zende) हा मोठा अधिकारी व्हावा, असे त्यांचे स्वप्न होते. परंतु, बालवयातील अतुल त्याबद्दल अज्ञान होते. अतुल यांची बहीण अभ्यासात हुशार, दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. मात्र, बारावीत थोडे कमी गुण मिळाल्याने तिला तिच्या आवडीच्या अभ्यासक्रमाला जाता आले नाही. त्यामुळे अतुलवरील जबाबदारी वाढली आणि वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनीही अभ्यासाला सुरवात केली.

तिसरी शिकलेल्या वडिलांनी ज्यूस बार चालविले, पण मुलाला 'आयपीएस' बनविलेच!
अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे ठरले 'रिअल सिंघम'

वडिलांचे तिसरीपर्यंतचे शिक्षण, आईची सहावीपर्यंत शाळा झाली होती. एक मुलगी व दोन मुलांमधून कोणीतरी मोठा अधिकारी व्हावा, असे त्यांचे स्वप्न. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी मुलांना कधीच परिस्थितीची जाणीव होऊ दिली नाही. मिळेल ते काम केले, 1991 मध्ये आयस्क्रीम व ज्यूस बार चालविला, परंतु त्यांचे शिक्षण पूर्ण केलेच. आई-वडिलांच्या स्वप्नांना यशाचे पंख देण्यासाठी अतुल यांनी जिद्द, मेहनत, चिकाटी सोडली नाही. पुण्यात ऍग्रीकल्चरलचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. 2007 मध्ये एका गुणाने त्यांची "एमपीएससी'ची संधी हुकली. परंतु, त्यांनी पुन्हा मेहनत केली आणि 2008 मध्ये घवघवीत यश मिळविले. ही कथा आहे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांची. सध्या ते सोलापूर ग्रामीणमधून रायगड जिल्ह्यात बदली होऊन गेले आहेत.

तिसरी शिकलेल्या वडिलांनी ज्यूस बार चालविले, पण मुलाला 'आयपीएस' बनविलेच!
एकेकाळी पायात चप्पलही नव्हते, मात्र आज करतोय कोट्यवधींची उलाढाल!

पुणे जिल्ह्यातील मूळचे दिवे गावचे असलेले अतुल झेंडे सध्या अप्पर पोलिस अधीक्षक आहेत. त्यांच्या गावातील संभाजीराव झेंडे यांच्यासह काहीजण मोठे अधिकारी झालेले होते. आई-वडिलांनी दाखविलेले स्वप्न पूर्ण करताना अतुल यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. प्राथमिक शिक्षण झेडपी शाळेत तर अकरावी-बारावीचे शिक्षण फलटणला त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर ते ऍग्रीकल्चरल अभ्यासक्रमासाठी पुण्यात आले. महाविद्यालयातील त्यांच्या मित्रांनाही स्पर्धा परीक्षेची ओढ होती. 2007 मध्ये अतुल यांना एका गुणाचे महत्त्व उमगले. त्यानंतर त्यांनी मागे ओळून पाहिले नाही. विशेष म्हणजे अतुल यांच्या ग्रुपमधील 21 मित्रांनी "एमपीएससी' परीक्षेत त्यावेळी यश मिळविले. 2008 मध्ये त्यांना एका खासगी बॅंकेत ऍग्रीकल्चरल अधिकारी म्हणून ऑफर आली होती. परंतु, वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. 2008 मध्ये पोलिस निरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली.

दरम्यान, त्यांनी "डीवाएसपी' या पदासाठीही परीक्षा दिली होती. त्यातही त्यांना यश मिळाले. सुरवातीला 15 महिने त्यांनी बुलडाणा जिल्ह्यात परिक्षाधिन कालावधी पूर्ण केला. त्यानंतर मानगाव (जि. रायगड) याठिकाणी त्यांनी त्याच पदावर 15 महिने काम केले. 2015 च्या नाशिक येथील कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी त्यांची निवड झाली. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांची अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून सोलापूरला बदली झाली. आता अडीच वर्षांनंतर त्यांची नुकतीच बदली रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.