सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रातील(paschim maharshtra) एक महत्त्वाची बाजारपेठ व उद्योग केंद्र असलेल्या सोलापुरातील गारमेंट निर्यातीवर (garment export)आलेले जीएसटी वाढीचे (GST)संकट सरत्या वर्षाच्या शेवटी टळले. त्यामुळे गारमेट उद्योग नव्या जोमाने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करू शकणार आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटा संपल्यानंतर सोलापूरचे जीएसटी कर (gst tax)संकलन वाढण्याची चिन्हे आहेत.
सरत्या वर्षात सोलापूर विभागातील व्यापार व उद्योगाने कोरोना संकटाचा सामना केला. अत्यंत विपरित स्थितीतही जीएसटी संकलनाचे आकडे वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी झाले. दिवाळी व इतर सिझनमधून व्यापाराची उलाढाल वाढली. त्यावर अवलंबून असलेल्या जीएसटी संकलनाचे आकडे देखील वाढले. त्या आधीच्या वर्षात म्हणजे वर्ष २०२०-२१ मध्ये झालेले जीएसटी संकलनाच्या तुलनेत संपत्या वर्षाचा आकडा १०० कोटी रुपयांनी वाढला आहे. दरम्यान, संपत्या वर्षात केंद्राने गारमेंटवर ५ च्या ऐवजी १२ टक्के जीएसटी संकलनाचा घाट घातला. पण माणसाच्या मुलभूत गरजामध्ये अन्न व निवाऱ्यासोबत वस्त्रांचा समावेश होतो. त्यामुळे त्याला स्थानिक गारमेंट निर्मात्यांनी जोरदार विरोध केला. अखेर विरोधानंतर हा निर्णय बारगळला आहे.
आताही काही जीएसटीचे स्लॅप बदलण्याची मागणी केली जात आहे. त्यामध्ये नव्याने ५, ८, १४ व २८ टक्के असे स्लॅप असावेत सांगितले जाते. पण प्रत्यक्षात सर्व क्षेत्राच्या शिफारशी घेऊन त्याबाबत निर्णय होणे गरजेचे आहे. जीएसटी यंत्रणेतील सुटसुटीतपणा अधिक असावा या बाबत सातत्याने मागणी केली जात आहे. जीएसटी सल्लागार समित्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरु असतो. नव्या वर्षात सोलापूर विभागाचा जीएसटी संकलनाचा आकडा ३०० कोटीचा आकडा ओलांडेल असे मानले जाते.
जीएसटी(GST) संकलनाच्या बाबतीत सध्याचे असलेले स्लॅब बदलावेत, अशी मागणी आमची आहे. तसेच ऑडिटची मर्यादा देखील पाच ऐवजी १० कोटी रुपये करावी. एक्झंम्पशन मर्यादा देखील ४० ऐवजी ७५ लाखांपर्यंत करावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
- राजू राठी,
अध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स व सदस्य जीएसटी सल्लागार समिती, सोलापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.