स्किड माऊंटेड टेक्निकने हवेतून ऑक्सिजन निर्मिती
प्रकल्पाची माहिती देताना आमदार परिचारक म्हणाले, राज्यात सहकारी क्षेत्रात अशा पध्दतीने उभारलेला व संपूर्ण परकीय तंत्रज्ञान असलेला हा पहिलाचा प्रकल्प आहे.
श्रीपूर (सोलापूर) : स्किड माऊंटेड पध्दतीने हवेतून ऑक्सिजन निर्मिती (Oxygen production) करणारा राज्याच्या सहकारातील पहिला पथदर्शी प्रकल्प येथील श्री पांडुरंग कारखान्याने उभारला आहे. सुपंत ऑक्सिजन निर्मिती (Oxygen production) प्रकल्प असे त्याचे नामकरण करण्यात आले असून, कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते आज त्याचे उद्घाटन करण्यात आले. (the first pilot project in the state co operation has been set up by shri pandurang factory at sreepur)
आमदार परिचारक यांच्या हस्ते या प्रकल्पाचे कोनशिला अनावरण व उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, दिनकरराव मोरे, दाजी पाटील, दिनकर नाईकनवरे, प्रणव परिचारक, रोहन परिचारक, ऋषिकेश परिचारक, यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य, अधिकारी, शेतकरी, कामगार उपस्थित होते. यावेळी प्रकल्प उभारणीसाठी योगदान देणा-या अनिल मोरे (नाशिक), अमित गॅस एजन्सीचे सचिन साखळकर यांचा आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रकल्पाची माहिती देताना आमदार परिचारक म्हणाले, राज्यात सहकारी क्षेत्रात अशा पध्दतीने उभारलेला व संपूर्ण परकीय तंत्रज्ञान असलेला हा पहिलाचा प्रकल्प आहे. नाशिक येथील साई कन्वेन्शन यांच्या माध्यमातून उभारलेल्या या प्रकल्पाचे सर्व तंत्रज्ञान तैवान येथून आयात केले आहे. प्रतिदिन २५ एमक्युब एवढी त्याची उत्पादन क्षमता आहे. गेल्या पंधरवड्यातच हा प्रकल्प कार्यान्वित झाला असता मात्र, तौक्ते वादळामुळे अडचण आली. त्यानंतर विमानाने ही मशिनरी आणून केवळ आठ तासात त्याची उभारणी केली आहे. येथून निर्माण झालेल्या आक्सिजनच्या गुणवत्तेची चाचणी झाली असून हा ऑक्सिजन दवाखान्यात वापरण्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यानंतर आज त्याचे उद्घाटन झाले आहे.
निसर्गाने आपल्याला ङ्गुकट ऑक्सिजन दिला आहे. मात्र, आजवर आपल्याला त्याची किंमत कळाली नव्हती. या काळात ऑक्सिजनची कमतरता जाणवली. गेल्या काही दिवसात राज्यात सतराशे ते साडे सतराशे टन ऑक्सिजन दवाखान्यांची गरज होती. तेवढी निर्मिती आपल्याकडे होत नव्हती. या परिस्थितीत ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले होते. वास्तविक राज्याच्या जडणघडणीत साखर कारखान्यांचे मोठे योगदान राहिले आहे. संकटाच्या काळात मदतीचा हात देण्याची जबाबदारी कारखान्यांनी नेहमीच घेतली आहे.
सुधाकरपंतांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग परिवाराने आपत्तीच्यावेळी नेहमीच धाडसाने मदतीचा हात दिला आहे. तीच परंपरा या माध्यमातून आपण पुढे चालवित आहोत. साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी, असा आदेश साखर संघ व साखर आयुक्तांनी काढला. मात्र, पांडुरंगच्या व्यवस्थापनाने त्यापुर्वीच निर्णय घेतला होता. साखर संघ साखर व आयुक्तांनी परिपत्रक काढण्यापुर्वीच पांडुरंगने या कामाचे नियोजन केले होते. त्यानुसार आज सहकारी उद्योगातील स्किट माऊंटींगचा हा पहिलाचा प्रकल्प पांडुरंगने कार्यान्वित केला आहे.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले, पांडुरगं कारखाना ख-या अर्थाने आजवर सामाजिक कार्य करीत आला आहे. दुष्काळात चारा छावण्या, टँकरने पाणीपुरवठा, अतिवृष्टीच्या काळात अडचणीत आलेल्यांना अन्नधान्याचा पुरवठा अशा माध्यमातून सतत मदत करीत आला आहे. शेतकरी सुखाय, कामगार हिताय ही भुमिका घेऊन सुधाकरपंत परिचारक यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. परिचारक परिवार आणि संचालक मंडळातील सदस्य त्यांचा संपन्न वारसा पुढे चालवित आहेत. सुंपत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प हा त्याचीच साक्ष देत आहे.
प्रतिदिन २५ एमक्युब एवढी या प्रकल्पाची उत्पादन क्षमता आहे. त्यासाठी साधारणतः ५५ के ६० लाख रू. खर्च आला असून, त्यात ४० ते ४५ लाख रूपयांची मशिनरी आहे. तैवान येथून मशिनरी आल्यानंतर केवळ आठ तासात या प्रकल्पाचे काम पूर्ण केल्याबद्दल आमदार परिचारक यांनी कार्यकारी संचालक डॉ. कुलकर्णी आणि तंत्रज्ञांचे विशेष अभिनंदन केले. (the first pilot project in the state co operation has been set up by shri pandurang factory at sreepur)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.