पडक्‍या वाड्याची पाटीलकी..!

पडक्‍या वाड्याची पाटीलकी..!
पडक्‍या वाड्याची पाटीलकी..!
पडक्‍या वाड्याची पाटीलकी..!Sakal
Updated on
Summary

सोलापुरातील सहकारी संस्था म्हंजी एकेकाळचं लईच भारी वैभव हुतं राव...

सोलापुरातील (Solapur) सहकारी संस्था (Co-operative Society) म्हंजी एकेकाळचं लईच भारी वैभव हुतं राव... अण्णा, अप्पा अन्‌ दादा हे तिघंबी येडंवाकडं काय हू नये म्हणूनशान या संस्थांच्या खजिन्यावर फणा काढून राह्यत हुती, म्हंजी हे तिघं 'भुजंग' हायती असं गमतीनं म्हणत हुते. ते खरंबी हुतं... ते हुते तोपतूर डीसीसीचं वैभव लईच भारी हुतं... दूध संघाचं संकलनबी त्या काळात जबर हुतं... संघाचं चेअरमन म्हंजी एका आमदारापेक्‍शाबी मोठ्ठं असं गणित हुतं... पण त्या तिघांच्या माघारी डीसीसी बॅंकेला लुबाडणाऱ्यांनी बॅंक अक्षरशः गिळली. सामान्य शेतकऱ्यांची परवड सुरू हाय... दूध संघांचंबी काय खरं नाय... आता त्येच्या मुंबईच्या जागेवर डोळा हाय असं दिसतुया... डीसीसी अन्‌ दूध संघाच्या 'पडक्‍या वाड्याची पाटीलकी' मिळवण्यासाठी नेत्यांनी लईच प्रयत्न सुरू केल्याती..! (The future of the co-operative societies in the district is in jeopardy)

पडक्‍या वाड्याची पाटीलकी..!
विठ्ठल-रुक्‍मिणी मातेच्या दागिन्यांचे बनवणार सोन्या-चांदीच्या विटा!

गेल्या काही वर्षांपास्न डीसीसी प्रशासकाच्या हाती हाय... त्येंना तर दररोजचा येगळाच अनुभव येतुया... बॅंक पूर्वपदावर आणण्यासाठी त्येंनी लईच प्रयत्न केले हायती... परंतु काही केल्या 'खाया न पिया गिलास फोडा आठ आना' अशीच स्थिती त्येंची हुतीया... त्यातच पूर्वीचे कर्मचारी, सायब लोकांनी संचालकांच्या मेहेरबानीवर असलेल्यांनी या प्रशासकाला काही जमू द्यायचं नाय असंच ठरवलंय... जिल्ह्यातल्या कुठल्या तरी शाखेत काही तरी गडबड हुतीयाच... पण तरीही बॅंकेच्या विलेक्‍शनसाठी बड्या नेत्यांनी धडपड सुरु केल्याचं दिसतंया... पुन्हा बॅंकेत येऊनशान कर्जमाफी मिळाल्याचा 'लाभ' उठवण्याची किमया करण्यासाठी सगळे प्रयत्न हायती... बॅंक खड्ड्यात पण हे बडे मातूर बड्या एसी गाडीतनं फिरताना दिसत्याती... कोणाकोणाच्या नावानं किती कर्ज हाय याचा हिशेब करता करता सगळ्यांच्याच नाकीनऊ आलंया...

दूध संघाचंबी असंच झालंया... हा संघ एकेकाळी शिखरावर हुता... आता मातूर प्रशासकांचे कचरा काढण्यातच दिवस जावू लागलेती... त्येंच्यावर कुरघोडी करण्यासाठी विलेक्‍शन घेण्याचंबी ठरलं हुतं... पण मंत्र्यांना विलेक्‍शन थांबवावं लागलं हुतं हा भूतकाळ... आता मतदार यादीचंबी लईच गुऱ्हाळ सुरु हाय... सोमवारी 316 मतदारांचा समावेश असलेली यादी प्रसिद्ध झाली. आता विलेक्‍शन लागंल. इथ दुधाचा पत्ता नाय पण राजकारण मातूर लईच चाललंया... याच्यासाठी मालकानं नुकतीच हुरडा पार्टीबी ठेवली हुती... तिथं मामा अन्‌ समविचारी आले नायती... पण बाकी सगळे महत्त्वाचे उपस्थित राह्यले हुते..!

पडक्‍या वाड्याची पाटीलकी..!
शेतकऱ्यांसाठी खुषखबर! बॅंकांकडून मिळणार आता वाढीव पीककर्ज

दूध संघासारख्या ठिकाणी तरी नेत्यांनी कार्यकर्त्यांना संधी दिली पाह्यजे असा सूर निघत हाय... इथं तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी काम केले तर राजकारणात एक चांगला संदेश जाईल. पण तसं होणं कठीण हाय..!

- सोन्याबापू आगलावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()