सरकारचा निर्णय ! पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी समिती

सरकारचा निर्णय ! पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी समिती
सरकारचा निर्णय ! पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी समिती
सरकारचा निर्णय ! पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी समितीCanva
Updated on
Summary

सरकारने सोमवारी अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती स्थापन केली. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत 14 सदस्य असणार आहेत.

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार (पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून विद्यापीठात अहिल्यादेवींचे स्मारक (Punyashlok Ahilya Devi Holkar Memorial) व्हावे, अशी मागणी झाली. विद्यापीठासह राज्य सरकारने (Government of Maharashtra) ती मागणी मान्य केली असून, त्याचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी सरकारने आज (सोमवारी) स्मारक समिती स्थापन केली. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत 14 सदस्य असणार आहेत.

सरकारचा निर्णय ! पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी समिती
सोलापूर विद्यापीठाच्या 'PET'चा बुधवारी निकाल ! 5 सप्टेंबरला मेरिट यादी

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची देशाच्या इतिहासात एक उत्तम प्रशासक, पराक्रमी सेनानी, न्यायप्रिय व्यक्‍ती, असंख्य जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लोकहिताची काम करणारी लोकमाता म्हणून ओळख आहे. सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्मारकातून प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांचा पूर्णाकृती पुतळा (स्मारक) त्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय झाला. आमदार रोहित पवार, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेकांनी त्यासाठी पाठपुरावा केला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही त्यात लक्ष घातले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्यासाठी निधी देण्याची घोषणाही केली. आता विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवनाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या इमारतीत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे स्मारक उभारणीची मागणी झाली. त्याअनुषंगाने स्मारक समितीची स्थापना करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला. समितीने दर्जेदार स्मारक होण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण अहवाल तीन महिन्यांत सादर करावा, असेही त्या आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारचा निर्णय ! पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी समिती
नोकरी करत उभारले बायोटेक पार्क! संशोधनातून शेतकऱ्यांची सेवा

नवीन प्रशासकीय इमारतीसमोर स्मारक

सध्या हिरज रोडवरील विद्यापीठाच्या जागेत मुख्य प्रशासकीय इमारतीचे व परीक्षा भवनाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारले जाणार असल्याचे शासनाच्या आदेशातून स्पष्ट झाले आहे. स्मारक समितीच्या माध्यमातून विद्यापीठाने विविध बैठकांचे आयोजन करावे, आगामी काही दिवसांत स्मारकाचा आराखडा (अहवाल) द्यावा, असेही आदेशात नमूद आहे.

स्मारक समितीतील पदाधिकारी...

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती नियुक्‍त करण्यात आली असून, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या कार्याध्यक्षा असणार आहेत. आमदार रोहित पवार, उत्तमराव जानकर, बाळासाहेब बंडगर-पाटील, अशोक पाटील, गेना दोलतोडे, डॉ. अनिकेत देशमुख, चेतन नरोटे, आदित्य फत्तेपूरकर, बाळासाहेब शेळके, श्रावण भवर, अस्मिता गायकवाड, सारिका पिसे, सुचिता व्हनकळसे - इवरे, जगन्नाथ क्षीरसागर यांची सदस्य म्हणून नियुक्‍ती झाली आहे. कुलसचिव डॉ. विकास कदम यांच्याकडे समन्वयकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.