वटवाघळांमुळे रखडले अ‍ॅडव्हेंचर पार्क! निवडणुकीपूर्वी उद्‌घाटननाट्य

वटवाघळांमुळे रखडले अ‍ॅडव्हेंचर पार्क! निवडणुकीपूर्वी 'स्मार्ट सिटी'चे उद्‌घाटननाट्य
वटवाघळांमुळे रखडले अ‍ॅडव्हेंचर पार्क! निवडणुकीपूर्वी उद्‌घाटननाट्य
वटवाघळांमुळे रखडले अ‍ॅडव्हेंचर पार्क! निवडणुकीपूर्वी उद्‌घाटननाट्यCanva
Updated on
Summary

स्मार्ट सिटीअंतर्गत ऍडव्हेंचर पार्क, स्ट्रीट बझारसह विविध कामे होऊन अजूनपर्यंत हस्तांतरण झालेले नाहीत.

सोलापूर : स्मार्ट सिटीअंतर्गत (Smart City) अ‍ॅडव्हेंचर पार्क (Adventure Park), स्ट्रीट बझारसह (Street Bazar) विविध कामे होऊन अजूनपर्यंत हस्तांतरण झालेले नाहीत. महापौरांच्या समितीने त्या सर्व कामांची पाहणी करून त्याचा अहवाल महापालिकेला (Solapur Municipal Corporation) दिला आहे. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्‍तांनी स्मार्ट सिटीला हस्तांतरणापूर्वी कामांमधील त्रुटी दूर करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. आता निवडणुकीचे बिगुल वाजल्याने सत्ताधाऱ्यांना स्मार्ट सिटीच्या कामांच्या उद्‌घाटनाची घाई लागली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे (NCP) पदाधिकारी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून उद्‌घाटनाचे प्रयत्न करीत आहेत.

वटवाघळांमुळे रखडले अ‍ॅडव्हेंचर पार्क! निवडणुकीपूर्वी उद्‌घाटननाट्य
अक्‍कलकोट, 'दक्षिण' कोरोनामुक्‍तीकडे ! पंढरपुरात परिस्थिती बिकटच

महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सध्या सुरू झाली असून एक प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार आहे. कोरोनामुळे महापालिकेला मागील दोन वर्षात काहीच उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शहरातील विकासकामांवर परिणाम झाला आहे. निवडणुकीपूर्वी काम दाखविण्यासाठी सत्ताधारी आता स्मार्ट सिटीतून झालेल्या कामांचे एकत्रित उद्‌घाटन करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, 14 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. त्या वेळी महापालिका आयुक्‍त भाजपचेच ऐकतात, ते भाजपचेच काम करतात, अशी तक्रार केली. भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचे काम होऊनही त्याचे हस्तांतरण झालेले नाही. अशा विविध मुद्‌द्‌यांवर त्यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली. स्मार्ट सिटीच्या कामासाठी राज्य सरकारचाही हिस्सा आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि सत्ताधारी भाजप यांच्यामध्ये आगामी काळात स्मार्ट सिटीच्या कामांच्या उद्‌घाटनाचे नाट्य पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये नेमके कोण उद्‌घाटन करणार, याची उत्सुकता लागली आहे.

वटवाघळांमुळे रखडले अ‍ॅडव्हेंचर पार्क! निवडणुकीपूर्वी उद्‌घाटननाट्य
हुंडा कमी दिल्याने विवाहितेला जिवे मारण्याचा प्रयत्न !

महापौर, विरोधी पक्षनेते, गटनेत्यांच्या समितीने स्मार्ट सिटीतून झालेल्या कामांची पाहणी केली. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यातील बाबींवर आधारित एक पत्र स्मार्ट सिटीला दिले आहे. कामांमधील त्रुटींची पूर्तता करून दिल्यानंतर त्या कामांचे हस्तांतरण केले जाईल.

- विक्रम पाटील, सहाय्यक आयुक्‍त, सोलापूर महापालिका

वटवाघळांमुळे रखडले ऍडव्हेंचर पार्क

वटवाघळांमुळे ऍडव्हेंचर पार्कचे हस्तांतरण रखडले असून, त्यांची विष्ठा खाली पडू नये म्हणून जाळी मारावी, असे महापालिकेने स्मार्ट सिटीला कळविले आहे. वटवाघळांच्या विष्ठेने पार्कमधील परिसर अस्वच्छ राहात आहे. त्यामुळे परिसर अस्वच्छ होणार नाही, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे महापालिकेने पत्रातून स्मार्ट सिटीला कळविले आहे. ऍडव्हेंचर पार्क चालवायला देण्यासाठी निविदा अंतिम केली आहे. स्मार्ट सिटीने त्रुटींची पूर्तता केल्यानंतर हस्तांतरणाची कार्यवाही पार पडेल, अशी माहिती सहाय्यक आयुक्‍त विक्रम पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.