सचिव निवडीवरून करमाळा बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत!

सचिव निवडीवरून करमाळा बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत!
Updated on
Summary

सभापती निवडीच्या वेळी बाजार समितीत झालेल्या वादातून करमाळा तालुक्‍याच्या राजकारणाची दिशा बदलून गेली.

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत (karmala market committee) सुरवातीला बागल गटाकडून शिवाजी बंडगर हे सभापती झाले. बाजार समितीवर असलेली तीस वर्षांची जयवंतराव जगताप यांची सत्ता घालवण्यात बागल गटाला निश्‍चित यश आले. ही सत्ता घालवण्यासाठी त्यांना नारायण पाटील गटाचे शिवाजी बंडगर यांना बागल गटात घ्यावे लागले. जगताप गटाची सत्ता जाण्यास शिवाजी बंडगर यांची बंडखोरी कारणीभूत ठरली. (the karmala market committee is once again in discussion over the election of a secretary)

सचिव निवडीवरून करमाळा बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत!
तुमचे फेक फेसबूक अकाउंट कोणीही उघडू नये म्हणून करा 'या' गोष्टी

सभापती निवडीच्या वेळी बाजार समितीत झालेल्या वादातून करमाळा तालुक्‍याच्या राजकारणाची दिशा बदलून गेली. यांचे परिणाम तालुक्‍यातील सर्वच प्रमुख गटांना भोगावे लागत आहेत. या घटनेला येत्या ऑक्‍टोबरमध्ये तीन वर्षे होत आहेत. तरीदेखील बाजार समितीचे तापलेले राजकारण शांत होताना दिसत नाही. गेली तीन वर्षात अनेक बैठकीला पोलिस बंदोबस्त लावावा लागला आहे. (ता. 21) रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सेवानिवृत्त होत असलेले सचिव सुनील शिंदे यांना मुदतवाढ देण्यावरून माजी सभापती जयवंतराव जगताप व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.

सचिव निवडीवरून करमाळा बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत!
पालकांमुळे 5 वर्षाच्या चिमुकलीसह 13 वर्षांच्या मुलाला कोरोना

सुरवातीला सचिव सुनिल शिंदे यांना मुदतवाढ देण्यास खुद्द जयवंतराव जगताप यांनीच विरोध दर्शवला. नंतर मात्र त्यांनी आपली भूमिका बदलत सुनील शिंदे यांना मुदतवाढ देण्याच्या बाजूने विषय लावून धरला. त्यामुळे वाद अधिकच वाढला. त्यामुळे सचिवांना मुदतवाढ देण्याचा विषय मतदानाला टाकण्यात आला. उपस्थित 16 संचालकांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आमदार संजय शिंदे समर्थक हमाल पंचायतीचे अध्यक्ष ऍड. राहुल सावंत यांचे संचालक रोडगे यांनी अनपेक्षितपणे जयवंतराव जगताप यांच्या विरोधात मतदान केले.

सचिव निवडीवरून करमाळा बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत!
आंदोलन निर्बंध शिथिलतेचे पण मागणी 'आयुक्‍त हटाव'ची!

वास्तविक पाहता बाजार समितीच्या निवडूक निकालानंतर आमदार शिंदे यांचा पाठिंबा जगताप यांना आहे. मात्र या बैठकीत जगतापांना समर्थन देणारे वालचंद रोडगे यांनी बागल गटाच्या बाजूने मतदान केले. तर नारायण पाटील समर्थक दत्तात्रय रणसिंग यांनी जयवंतराव जगताप यांच्या बाजूने मतदान केले. समान मतदान झाल्यामुळे सभापती शिवाजी बनगर यांनी विशेष मताचा वापर करून सचिवांना मुदतवाढ देण्याचा विषय संपवला. तरीही बाजार समितीचे सचिव कोण होणार हा विषय इथेच संपला नाही.

सचिव निवडीवरून करमाळा बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत!
रूग्ण घटताहेत पण मृत्यूदराची चिंता! 'या' कारणामुळे वाढले मृत्यू

बागल गटाचे नेते दिग्विजय बागल व त्यांच्या गटाच्या संचालकांनी प्रभारी सचिव म्हणून राजेंद्र पाटणे यांना नेमणूक करण्याचे ठरवले. तर सेवाज्येष्ठतेनुसार राजेंद्र पाटणे यांना सचिव म्हणून नेमता येणार नाही, सेवाज्येष्ठतेनुसारच पुढील सचिवपदाची संधी द्यावी, अशी भूमिका जयवंतराव जगताप यांनी घेतली. त्यामुळे (ता. 31) रोजी सचिव कोण हा विषय चर्चेसाठी होता. बाजार समितीतील वातावरण पाहता मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

सचिव निवडीवरून करमाळा बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत!
बालकांची 10 जूनपासून तपासणी : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

यावेळी मात्र बागल गटाकडे बहुमत असूनही सत्ताधाऱ्यांना न जुमानता सेवानिवृत्त होत असलेले सचिव सुनील शिंदे यांनी सेवाज्येष्ठतेनुसार असलेले विठ्ठल क्षीरसागर यांच्याकडे पदभार दिला. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सेवानिवृत्त होत असलेले सचिव उघडपणे जातात. याचा सत्ताधाऱ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. तर सत्ताधारी व विरोधकांनी कायमच राजकीय भूमिकेतून बाजार समितीकडे न पाहता शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी एकत्र येऊन कामकाज करावे, अशी माफक अपेक्षा शेतकरी वर्गाची आहे.(the karmala market committee is once again in discussion over the election of a secretary)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.