दमदार पावसाअभावी खरीप हंगाम संकटात ! शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

दमदार पावसाअभावी खरीप हंगाम संकटात ! शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे
Kharip
KharipCanva
Updated on

यावर्षी संपूर्ण करमाळा तालुक्‍यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने एक मोठा ब्रेक घेतला आहे. त्यामुळे पेरणीपूर्ण मशागती होऊनही पेरण्या खोळंबल्या असून, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

केत्तूर (सोलापूर) : यावर्षी संपूर्ण करमाळा तालुक्‍यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने एक मोठा ब्रेक घेतला आहे. त्यामुळे पेरणीपूर्ण मशागती होऊनही पेरण्या खोळंबल्या असून, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम (Kharif season) संकटात येण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्‍त होत आहे. सध्या जून महिना संपून जुलै महिना सुरू झाला तरी पावसाचा पत्ताच नाही. शेती मशागतीची कामे संपली आहेत. खरीप हंगामासाठी पेरणी मात्र पावसाअभावी थांबली आहे. (The kharif season is in crisis due to no heavy rains)

Kharip
नरेंद्र पाटील म्हणाले, ज्यांना अधिवेशनच नको त्यांना मोर्चे कसे चालतील?

रोज आभाळ भरून येत आहे. पाऊस पडणार असे संकेतही मिळत आहेत; परंतु दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखा तुरळक पाऊस फक्त होत आहे. मोठा, दमदार पाऊस मात्र गुंगारा देत आहे. त्यातच दिवसभर जोरदार वारेही वाहत आहेत. काही ठिकाणी तुरळक रिमझिम पाऊस होत असल्याने जमिनीत मात्र ओलावाही निर्माण होत नाही. खरिपाच्या पेरण्या होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असताना पाऊस मात्र पडत नसल्याने खरिपाचा हंगाम हातातून जाण्याची शक्‍यता शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे

Kharip
अमेरिकेतील शीतल सोनार उलगडणार अक्षरकलेतून पंढरीची वारी !

या वर्षी हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे चांगला पाऊस पडेल व खरिपाची पिके जोरदार येऊन गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे झालेले नुकसान भरून निघेल या आशेने शेतकऱ्यांनी खरिपाची संपूर्ण तयारी केली आहे. परंतु पावसाने ओढ दिल्याने पेरण्या थांबल्या आहेत. त्यामुळे खरिपाचे नियोजन व मोडून आर्थिक फटका बसणार आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. सध्या शेतकऱ्यांनी जमीन तयार करून ठेवल्या आहेत; मात्र जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत तिफन चालवायची नाही, असे देलवडी (ता. करमाळा) येथील शेतकरी शिवाजी चाकणे यांनी "सकाळी'शी बोलताना सांगितले.

खरिपाच्या पेरणीसाठी गेल्या काही दिवसांत शेतीची मशागत करून ठेवली आहे. परंतु मोठ्या पावसाची अपेक्षा असताना पावसाने पाठ फिरवल्याने पेरणी करणे अवघड झाले आहे.

- किरण झेंडे, खातगाव (ता. करमाळा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.