सोलापूर : मुंबई- सोलापूर- हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर अर्थात बुलेट ट्रेनसाठी (Billet Train) लिडार सर्व्हे (Lidar Survey) गुरुवार, 13 मेपासून पुणे (Pune) येथील हडपसर (मांजरी) येथून सुरू होऊन सायंकाळी सोलापूरला पोचेल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. 711 किलोमीटर अंतराच्या या सर्व्हेचे काम पुणे येथून सुरू होणार आहे. जिल्ह्यातील महामार्गालगत लिडार सर्व्हे करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे येथील मांजरी येथून सुरवात होणार आहे तर सोलापूर येथे गुरुवारी (ता. 13) सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास लिडार सर्व्हे करण्यात येणार आहे. (The lidar survey of Mumbai to Hyderabad bullet train has started from today)
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) तर्फे हा सर्व्हे करण्यात येणार आहे. या डीजीपीएस प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) बनविण्यासाठी हा सर्व्हे केला जात असल्याची माहिती संचालक संतोष देसाई यांनी दिली. 13 मे रोजी चार्टर विमानाने पुणे ते सोलापूर दरम्यान सर्व्हे करण्यात येणार आहे. दरम्यान सर्व्हेचे चित्रीकरण केले जाणार आहे. चार्टर विमानात दोन व्यक्ती सर्व्हेसाठी असणार आहेत. 711 किलोमीटर अंतराच्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे पुणे, बारामती, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, जहीराबाद, हैदराबाद ही शहरे जोडली जाणार आहेत.
लिडार सर्व्हेमध्ये एका विमानाला लिडार आणि फोटो किंवा व्हिडिओ दिसणारे सेन्सर्स लावलेले असतात. हे विमान हवेतून प्रस्तावित मार्गाचा (लाईट डिटेक्शन अँड रेजिंग सर्व्हे) अर्थात लिडार सर्व्हे पूर्ण करते. त्यात प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या आजूबाजूच्या दीडशे मीटरपर्यंतच्या प्रदेशाचे हवाई चित्रीकरण केले जाते. त्यासाठी शंभर मेगापिक्सल क्षमता असलेला कॅमेरा वापरला जातो. त्यानंतर त्याचा त्रिमिती म्हणजे रेडी नकाशा तयार केला जातो. त्यामध्ये त्या मार्गाच्या आजूबाजूला असलेल्या इमारती, डोंगर, झाडे आदी सर्व बारीकसारीक गोष्टी, लांबी, रुंदी, उंचीनुसार म्हणजे त्रिमितीमध्ये पाहता येतात. याबरोबरच प्रवासी संख्या आणि इतरही सर्व्हे केला जात असून, ही सर्व माहिती संकलित झाल्यानंतर त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला या वर्षातच सादर करण्यात येणार आहे. कोणत्याही रेखीय पायाभूत सुविधांच्या प्रकल्पात अशा संरक्षणाला विशेष महत्त्व असते. नेहमीच्या पद्धतीने हा सर्व्हे केल्यास त्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ लागतो. लिडार सर्व्हेमुळे हे काम तीन ते चार दिवसांत पूर्ण केले जाणार आहे.
ही शहरे जोडली जाणार
मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, जहीराबाद, हैदराबाद.
डीजीपीएस सर्व्हे (ग्रेट टेक्नो मॅट्रिकल सर्व्हे) सोलापूर जिल्ह्यात आणि पंढरपूरमध्ये सुरू आहे. हा सर्व्हे 30 एप्रिलपर्यंत पूर्ण केला आहे. 13 मेपासून पुणे ते सोलापूर दरम्यान लिडार सर्व्हे केला जाणार आहे.
- संतोष देसाई, संचालक, मोनार्क सर्व्हेअर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.