घरबसल्या ऑनलाइन काम करा अन्‌ हजारो कमवा ! सायबर क्राईमचा नवा फंडा

घरबसल्या ऑनलाइन काम करा अन्‌ हजारो कमवा ! सायबर क्राईमचा नवा फंडा
Cyber Crime
Cyber CrimeMedia Gallery
Updated on

देशात सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. त्यामुळेच सायबर गुन्ह्यांचं प्रमाणंही वाढलं आहे.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : देशात सोशल मीडिया (Social Media) आणि इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. त्यामुळेच सायबर गुन्ह्यांचं (Cyber Crime) प्रमाणंही वाढलं आहे. लॉकडाउनच्या (Lockdown) काळात अर्थव्यवस्था (Economy), शिक्षण (Education) आणि मनोरंजन (Entertainment) या तिन्ही गोष्टी सायबर स्पेसमध्ये आल्या. अर्थात मोबाईल, लॅपटॉपचा वापर वाढला. या गोष्टीचा फायदा सायबर गुन्हेगार (Cyber criminals) घेत असून, या माध्यमावर नव्यानं प्रवेश करणाऱ्यांना ते "लक्ष्य' करत आहेत. सायबर क्राईमचे नवनवीन फंडे समोर येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे घर बसल्या "डाटा एंट्री'चे (Data Entry) काम करून महिन्याकाठी हजारो रुपये मिळतील अशी आशा दाखवून होत असलेली फसवणूक. (The lure of making thousands of rupees by working online from home is being shown by cyber criminals)

Cyber Crime
शहरातील तरुणांची लसीसाठी ग्रामीणकडे धाव ! ग्रामीणमध्ये ऑन दि स्पॉट नोंदणी

सध्याच्या कोरोना (Covid-19) महामारीच्या संकटामुळे व लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे हताश झालेले हे लोक रोजगाराच्या शोधात इकडे तिकडे ऑनलाइनच्या वेबसाईटवर नोकरीच्या शोधात दिसतात. ही बाब लक्षात घेऊन सायबर गुन्हेगारांनी अशा लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून फसवणूक करत आहेत. दिवसातले फक्त दोन तास ऑनलाइन घरबसल्या काम करून दरमहा 25 ते 30 हजार रुपये कमवा... त्यासाठी कोणत्याही डिग्रीची गरज नाही... कॉम्प्युटर - लॅपटॉप - मोबाईल वापरून डाटा एंट्रीचे काम करा आणि महिना 50 हजार रुपयांपर्यंत कमाई करा... अशा जाहिराती सोशल मीडियावर देतात.

मग नोकरीच्या शोधात असलेल्या नागरिकांनी गूगलवर Data entry job असं काही तरी सर्च केलं की, लगेच मोबाईलवर मेसेज येतो. त्या लिंकवर क्‍लिक केलं की, एक वेबसाइट ओपन होते. तिथे ज्या कंपनीच्या जॉबच्या जागा (job vacancy) आहेत, ती लिंक दिसते. तिथे कामाचे स्वरूप दिलेले असते. प्रिंटेड पेजेस (Printed pages) वरील मजकूर फक्त आहे तसा टाईप करायचा असतो, असंच काहीतरी सोपं काम असतं. जर तुम्हाला काम आवडले तर तुम्ही फॉर्म (form) भरून द्यायचा. मग कामाचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी तुमच्या बॅंक खात्याचा तपशील मागितला जातो. त्यासाठी तुमचा घरगुती पत्ता (postal address) तर हवाच. शिवाय तुमचा एक फोटो अपलोड करावा लागतो. एका कागदावर तुमची सही करून त्या सहीचा फोटो काढून पीनजी फॉर्मेट (png formate) यामध्ये अपलोड (upload) करावा लागतो. फॉर्म सबमिट (submit) करून तुमचं रजिस्ट्रेशन सक्‍सेसफुल (successful) झालं की काम झालं, घरबसल्या नोकरी लागली असे वाटते.

Cyber Crime
सेतू अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध करण्याची होतेय शाळांकडून मागणी !

मग नंतर संबंधित नोंदणीकृत व्यक्तीला एक काम दिले जाते. 8 ते 10 पाने 8 दिवसांत टाईप करून द्यायची असतात. ती 3 ते 5 दिवसांतच टाईप करून पूर्ण करून दिली की, मग ते केलेल्या कामाची (work) अचूकता (accuracy) तपासतात. 90 टक्के अचूकता (accuracy) नसेल तर ते नाकारले (reject) जाते. परत तुम्ही पुन्हा ते काम 100 टक्के अचूक (accurate) करून सबमिट करता. पुन्हा ते नाकारले जाते. तुम्ही एकाधिक साधने वापरता (multiple devices use) असे कारण दिलेले असते. त्यामुळे तुम्ही पाठवलेल काम प्रत्येकवेळी नाकारले जाते. शेवटी वैतागून तुम्ही ते काम सोडून देता, किंवा मला तुमचे काम नको आहे असे त्या कंपनीला कळवता. परंतु ही झाली एक बाजू, पण इथून पुढे खरा खेळ सुरू होतो...

एके दिवशी तुम्हाला कंपनीच्या वकिलाचा फोन येतो. तुम्ही कंपनीशी केलेल्या कराराचा भंग (contract breach) केलेले आहे, म्हणून तो तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देतो. तुम्हाला दिलेलं कंपनीचं काम तुम्ही वेळेत आणि अचूक (accurate) करून न दिल्याने कंपनीचे नुकसान झालेले आहे, त्याची नुकसान भरपाई रक्कम तो मागतो. एक तर काम पूर्ण करून द्या, किंवा कंपनीचे झालेले नुकसान तरी भरून द्या अशी त्या वकिलाची मागणी असते. त्यांच्या या कटकारस्थानात तुम्ही नकळत अडकलेले असल्याने, एकतर कायदेशीर कारवाईला घाबरून 40 ते 50 हजार भरून टाकता किंवा मग सपशेल दुर्लक्ष तरी करता. पैसे भरले तरी हे इथेच थांबत नाही. कंपनीसोबत तुम्ही केलेले करारपत्र (agreement) तुम्हाला पाठवले जाते. त्यात अनेक अटी व शर्ती असतात. तुम्ही जर मध्येच काम सोडून दिले तर 11 महिन्यांचे पैसे तुम्हाला कंपनीला द्यावे लागतील अशी एक शर्त तुम्ही मान्य केलेली असते. कंपनी तुमच्याकडे 5 ते 10 लाखांची मागणी करते. तुम्ही करारपत्र लिहून दिलेले नसते पण तुमच्या सहीचा व फोटोचा वापर करून हे करारपत्र कंपनीने अस्तित्वात आणलेले असते.

Cyber Crime
चिमुकल्याला ओलिस ठेवून त्याच्या आईकडून घेतले पावणेदोन लाखांचे दागिने

कायदेशीर कारवाईच्या भीतीने तुम्हाला पैसे भरावे लागतात किंवा मग तुम्ही दुर्लक्ष करता. नंतर हे सायबर गुन्हेगार दूरच्या कुठल्यातरी शहरात तुमच्या विरुद्ध एफआयआर दाखल केलेला आहे असे तुम्हाला दाखवले जाते व या कंपनीचा वकील तुम्हाला सतत तडजोड करून लमसम रुपये भरा, मी प्रकरण मिटवून टाकतो, असा तगादा लावत असतो. तुम्ही वैतागून निम्मी आर्धी रक्कम भरून प्रकरण मिटवून टाकता. चार पैसे मिळवण्याच्या नादात तुम्ही कंपनीलाच पैसे देऊन मोकळे होता. हे प्रकरण संपता संपत नाही, कारण तुम्ही दिलेल्या इलेक्‍ट्रॉनिक सहीचा ते कुठेही कसाही गैरवापर करून ते तुम्हाला लुबाडू शकतात. कारण, सोप्या कामाचे कुणीही एवढे पैसे देत नाही. तुम्हाला महिना 50 हजार देण्यापेक्षा 10 ते 15 हजारात ते एखादा टायपिस्ट कामाला ठेवू शकत नाहीत का? त्यामुळे घरबसल्या सहज पैसे (Easy Money) मिळवण्याच्या मोहापोटी तुम्ही या असल्या जाळ्यात फसू नका. अशी काही फसवणूक झाल्यास सरळ सायबर सेलकडे तक्रार करा, असे आवाहन सायबर सेलच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

घरबसल्या असे कुणी पैसे देत नसतात. नागरिकांनी सोशल मीडियाचा व अशा बनावट लिंक तसेच वेबसाईटचा वापर काळजीपूर्वक करावा. सायबर गुन्हेगार वेगवेगळी आमिषे दाखवून तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अडकवून फसवणूक करत असतात. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

- अंकुश चिंतामण, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पुणे शहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()