नातेपुते ग्रामपंचायत विसर्जित ! आदर्श नगरपंचायत म्हणून व्हावी ओळख

88 वर्षांची नातेपुते ग्रामपंचायत विसर्जित ! आदर्श नगरपंचायत म्हणून व्हावी ओळख
88 वर्षांची नातेपुते ग्रामपंचायत विसर्जित ! आदर्श नगरपंचायत म्हणून व्हावी ओळख
88 वर्षांची नातेपुते ग्रामपंचायत विसर्जित ! आदर्श नगरपंचायत म्हणून व्हावी ओळखCanva
Updated on
Summary

88 वर्षांपूर्वीची येथील ग्रामपंचायत विसर्जित होऊन येथे आता नव्याने नगरपंचायत निर्माण करण्यात आली आहे.

नातेपुते (सोलापूर) : महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शहर म्हणून नातेपुतेचा (Natepute) लौकिक झालेला आहे. सोलापूर (Solapur), सातारा (Satara), पुणे (Pune) या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर वसलेले हे गाव. राज्यातील मोठी बाजारपेठ म्हणून आणि शिखर शिंगणापूरच्या (Shikhar Shingnapur) पायथ्याशी वसलेली शंभूनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावरील गाव म्हणून आध्यात्मिक क्षेत्रात संपूर्ण राज्यात परिचित आहे. 88 वर्षांपूर्वीची येथील ग्रामपंचायत विसर्जित होऊन येथे आता नव्याने नगरपंचायत निर्माण करण्यात आली आहे. येथील नवीन नगरपंचायत राज्यातील एक आदर्श नगरपंचायत म्हणून ओळखली जावी, यासाठी आता सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

88 वर्षांची नातेपुते ग्रामपंचायत विसर्जित ! आदर्श नगरपंचायत म्हणून व्हावी ओळख
उपळाई आरोग्य केंद्रात त्रुटी! तपासणीसाठी आयएएस आव्हाळेंची नेमणूक

1933 साली या ग्रामपंचायतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या राजवटीत झाली होती. त्याकाळी सर्वसंमतीने सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडी होत असत. त्यानंतर अनेकांनी या ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच ही पदे भूषविली आहेत. या सर्वांनी आपल्या काळात नातेपुतेच्या विकासात योगदान दिले आहे.

2018 साली पहिला ठराव

ऍड. भानुदास यशवंत राऊत यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होण्यासाठी ठराव केला होता. 11 सप्टेंबर 2019 रोजी राज्य सरकारकडून पहिला अध्यादेश जारी झाला होता. त्यानंतर अनेक आंदोलने, निवेदने आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर 3 ऑगस्ट 2021 रोजी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. ग्रामपंचायत बरखास्त केल्यानंतर प्रशासक म्हणून अरविंद माळी यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.

88 वर्षांची नातेपुते ग्रामपंचायत विसर्जित ! आदर्श नगरपंचायत म्हणून व्हावी ओळख
पाच तालुक्‍यांसाठी कंटेन्मेंट झोन ! पोलिस बंदोबस्तासाठी बीडीओंना सूचना

नगरपंचायतीमुळे येईल विकासाला वेग

88 वर्षात नातेपुते गावाची सर्वांगीण प्रगती झाल्याचे आपणास दिसून येते. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे, निवडणुकीच्या काळात फक्त आठ ते दहा दिवस राजकारण असते. नंतर सर्वजण एकमेकांच्या आनंदात आणि दुःखात सहभागी होत असतात. व्यापारी केंद्र असल्यामुळे राजकारण दुय्यम समजून गावाच्या प्रगतीसाठी सर्व गट-तट प्रयत्न करताना दिसत आहेत. वेगळवेगळ्या सरपंचांच्या काळात गावाच्या विकासाला योगदान देण्यात आले. तरीही येथे नगरपंचायत असणे फार गरजेचे होते. आता येथे नव्याने नगरपंचायत स्थापन झाली असून यामुळे शहराच्या विकासाला वेग येणार आहे.

शहरीकरणामुळे वाढल्या लोकांच्या गरजा

वरिष्ठ पदावर असणारे वर्ग 1, वर्ग 2 चे अनेक अधिकारी, व्यापारी येथे स्थायिक झाले असून ते नातेपुतेकर झाले आहेत. शहरात शांतता आणि कायदा- सुव्यवस्था चांगली आहे. मात्र, ग्रामपंचायतींना आर्थिक मर्यादा असतात. नगरपंचायत झाल्यामुळे राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी येऊ शकतो. वाढत्या शहरीकरणामुळे लोकांच्या गरजा वाढलेल्या आहेत. शहराच्या उत्तरेला विस्तारित पाणीपुरवठा योजनेची गरज आहे. वाड्या-वस्त्यांवरही शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी आहे. त्यामुळे येथे नगरपंचायत हाच पर्याय होता. नगरपंचायत झाल्यामुळे तरुणांना अद्ययावत क्रीडांगण मिळेल, नगरपंचायतीकडून बालोद्यानची निर्मिती होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने नवीन पदाधिकारी प्रयत्न करतील, अशी आशा आहे.

सध्या तरी प्रशासक अन्‌ मुख्याधिकाऱ्यांवर मदार

सध्याच्या परिस्थितीमध्ये लगेचच नगरपंचायतीच्या निवडणुका होतील, असे वाटत नाही. या काळात अनुभवी प्रशासक आणि अनुभवी मुख्याधिकारी यांच्यावरच गावाचा आराखडा तयार होईल, असे दिसते. ही नगरपंचायत आदर्श करण्याचा ध्यास तरुणांनी घेतला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळणार असल्यामुळे तेही नगरपंचायतसाठी जास्तीत जास्त झोकून काम करतील आणि गावाच्या विकासाला गती येईल, अशी आशा आहे.

88 वर्षांची नातेपुते ग्रामपंचायत विसर्जित ! आदर्श नगरपंचायत म्हणून व्हावी ओळख
श्रावण विशेष : अध्यात्माची अनुभूती देणारी चिंचगाव टेकडी !

आतापर्यंतचे सरपंच...

नातेपुतेच्या पहिल्या सरपंच पदाचा मान कै. भोजराव संभाजी देशमुख ऊर्फ बापूसाहेब यांना मिळाला होता. यानंतर कै. भास्कर महादेव उराडे, कै. मुधोजीराव भोजराव देशमुख, कै. रघुनाथराव गेनबा उराडे, कै. रामचंद्र नागनाथ भांड, कै. शिवाजीराव भोजराव ऊर्फ आप्पासाहेब देशमुख, सुरेखा राजकुमार उराडे, कमल जालिंदर ठोंबरे, सुवर्णा संपतराव पांढरे, महावीर साळवे, शहाजीराव मुधोजीराव ऊर्फ बाबाराजे देशमुख, अमरशील देशमुख, ऍड. रावसाहेब पांढरे, ऍड. भानुदास राऊत, कांचन दादासाहेब लांडगे, अशा पंधरा जणांनी येथील सरपंचपद भूषविले आहे.

आतापर्यंतचे उपसरपंच...

उपसरपंचपदाचा पहिला मान कृष्णाजी हरजी पाटील यांना मिळाला होता. मुधोजीराव देशमुख, डॉ. रतनचंद फुलचंद दोशी, नारायण काळे, राजेंद्र हनुमंतराव पाटील, वामन दामोदर पलंगे, भीमराव पांढरे, जितेंद्र चंद्रकांत पलंगे, चंद्रशेखर नागनाथ भांड, धैर्यशील मुधोजीराव देशमुख, चंद्रकांत शंकरराव ठोंबरे, अतुल राजेंद्र पाटील, सुनंदा राजेंद्र उराडे, पुन्हा अतुल राजेंद्र पाटील यांनी हे पद भूषविले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.