नाराज नगरसेवकांचा ठिय्या 'राधाश्री'वर! आघाडीची शक्‍यता धूसरच

नाराज नगरसेवकांचा ठिय्या 'राधाश्री'वर! महाविकास आघाडीची शक्‍यता धूसरच
नाराज नगरसेवकांचा ठिय्या 'राधाश्री'वर! महाविकास आघाडीची शक्‍यता धूसरच
नाराज नगरसेवकांचा ठिय्या 'राधाश्री'वर! महाविकास आघाडीची शक्‍यता धूसरचesakal
Updated on
Summary

शहरातील प्रभाग रचना अंतिम झाली असून, मान्यतेसाठी शासन दरबारी पाठविण्यात आली आहे.

सोलापूर : शहरातील प्रभाग रचना अंतिम झाली असून, मान्यतेसाठी शासन दरबारी पाठविण्यात आली आहे. तत्पूर्वी, महापालिकेचा (Solapur Municipal Corporation) महापौर राष्ट्रवादीचाच (NCP) होण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनी 'एमआयएम'मधील (MIM) नाराजांना आपलंसं करण्याची जबाबदारी तौफिक शेख (Tawfiq Shaikh) तर, वंचित बहुजन आघाडी (Wanchit Bahujan Aghadi), बसपतील (BSP) नाराजांना राष्ट्रवादीत आणण्याची जबाबदारी आनंद चंदनशिवे (Anand Chandanshive) यांच्यावर सोपविल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेना (Shiv Sena), कॉंग्रेस (Congress) व भाजपमधील (BJP) नाराजांवर महेश कोठेंनी (Mahesh Kothe) वॉच ठेवला आहे. (The Nationalist Congress Party is preparing for the municipal elections)

नाराज नगरसेवकांचा ठिय्या 'राधाश्री'वर! महाविकास आघाडीची शक्‍यता धूसरच
तुमच्या वाहनावर दंड आहे का? अन्‌ तुम्हाला तो रद्द करायचाय का?

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची शक्‍यता धूसर मानली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने 114 जागांवर तगड्या इच्छुकांना उमेदवारी देण्याचे डावपेच आखायला सुरवात केली आहे. दरम्यान, वर्षानुवर्षे कॉंग्रेसमध्ये काम करूनही आमदारकीचे स्वप्न अपूर्णच राहिल्याने कोठेंनी शिवसेनेचे धनुष्य हाती घेतले. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून त्यांचा दोनदा पराभव झाल्यानंतर त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी माझे काम केले नाही, वरिष्ठांनीही त्याकडे लक्ष दिले नाही म्हणत राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. महापालिकेवरील सत्तेसाठी कोठे हेच निर्णायक ठरतील, या जाणीवेतून खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोलापूर दौरा केला. त्यांनी महापालिका निवडणुकीची धुरा महेश कोठेंवर सोपविली. त्यानंतर महापालिकेतील त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मनोहर सपाटे यांच्याशी जुळवून घेतले. माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, गटनेते किसन जाधव यांच्यासह पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांचा मेळ बसवायला सुरवात केली. शिवसेनेतील त्यांचे समर्थक नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी आपण जिकडे जाऊ, तिकडेच येतील, याचीही त्यांनी पुरेशी खबरदारी घेतली. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची मदत घेतली. वेळप्रसंगी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशीही थेट संपर्क केल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत सध्या राष्ट्रवादीचे चार नगसेवक असून ते 40 पेक्षा अधिक करण्याचे प्लॅनिंग आता 'राधाश्री'वरून सुरू झाले आहे.

आचारसंहितेनंतर नगरसेवकांचे पक्षांतर?

महापालिकेतील जवळपास 14 ते 16 नगरसेवक हे महेश कोठेंचे समर्थक मानले जातात. त्याचबरोबर कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नगरसेवक ऍड. यू. एन. बेरिया (U. N. Beria) हेदेखील आता उघडपणे कोठेंच्या सांगाव्यावरून राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहात आहेत. कॉंग्रेसच्या नगरसेविका प्रिया माने व श्रीदेवी फुलारे यांनी पक्षाचे काम सोडल्याची कबुली शहराध्यक्षांनी यापूर्वीच दिली आहे. मात्र, ज्या पक्षांच्या चिन्हावर निवडून आलो, पक्षांतर बंदी कायद्याने तो पक्ष मधूनच सोडता येत नाही. तो कायदा मोडल्याचे सिद्ध झाल्यास किमान सहा वर्षे निवडणूक लढवता येत नाही. त्या जाणीवेतून अनेकांनी पक्षांतर करण्यापूर्वी अप्रत्यक्षपणे आतापासूनच राष्ट्रवादी तथा त्यांच्या नेत्यांचे काम सुरू केले आहे. आचारसंहिता लागताच ते पक्षांतर करतील, हे निश्‍चित मानले जात आहे.

नाराज नगरसेवकांचा ठिय्या 'राधाश्री'वर! महाविकास आघाडीची शक्‍यता धूसरच
नऊशे वर्षांची परंपरा! सिद्धेश्‍वर यात्रा परवानगीबाबत आज निर्णय

जानेवारीत आरक्षणाच्या चिठ्ठ्या

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने महापालिका आयुक्‍तांनी आपल्या मनासारखी वॉर्डरचना करावी, असे काहींनी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. परंतु, केंद्रात भाजपची सत्ता असल्याने आपण अडचणीत येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेऊन आयुक्‍तांनी नियमानुसार वॉर्डरचना केल्याचेही बोलले जात आहे. राज्य शासनाकडून त्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्येक वॉर्डासाठी तीन चिठ्ठ्या काढल्या जातील. त्यात 'एससी' प्रवर्ग, महिला व पुरुष अशा चिठ्ठ्या असतील. चिठ्ठ्यांनुसार त्या प्रभागात किती महिला-पुरुष, आरक्षण काय, यानुसार तगडा उमेदवार कोण याचा अंदाज घेतला जाईल. तो ज्या पक्षात आहे, त्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास नगरसेवक होण्यासाठी संबंधित इच्छुक कोलांटउडी घेणार, अशीही चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.