Solapur : आमदार प्रणिती शिंदेंच्या मनात आहे तरी काय?

आमदार प्रणिती शिंदेंच्या मनात आहे तरी काय? कॉंग्रेसमधील नाराजांवर राष्ट्रवादीचाच डोळा
praniti shinde
praniti shindeesakal
Updated on
Summary

आता कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक ऍड. यू. एन. बेरियांनाही राष्ट्रवादीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

सोलापूर : ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसमधील (Congress) धुसफूस बाहेर पडू लागली आहे. कॉंग्रेससह इतर पक्षातील नाराजांना हेरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) आणले जात असून त्याची प्रमुख जबाबदारी महेश कोठेंच्या (Mahesh Kothe) खांद्यावर दिल्याचे बोलले जात आहे. माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर नलिनी चंदेले यांनी कॉंग्रेसला 'हात' दाखवून राष्ट्रवादीचे "घड्याळ' हाती बांधले. त्यानंतर आता कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक ऍड. यू. एन. बेरियांनाही राष्ट्रवादीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. ऍड. बेरिया यांना कॉंग्रेसने आजवर खूप काही दिले असून त्यांनी कॉंग्रेस सोडू नये, यासाठी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी गटनेते चेतन नरोटे यांना शिष्टाईसाठी पाठविल्याची माहिती समोर आली आहे. कॉंग्रेसमधील नाराजांवर महेश कोठेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीने वॉच ठेवला आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी आगामी भूमिका काय असणार, याची उत्सुकता लागली आहे.

praniti shinde
'MPSC'च्या हजारो उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा!

महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. खऱ्या अर्थाने महापौरपद मिळविण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षातच स्पर्धा लागल्याची स्थिती आहे. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या महेश कोठेंचे महत्त्व वाढले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे कोठेंच्या घरी येऊन गेल्यानंतर ते अधिकच सक्रिय झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, एमआयएममधून तौफिक शेख यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने 'महापालिकेवर सत्ता आमचीच' असा दावा पदाधिकारी करू लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांनीही पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची वाट धरली आहे. परंतु, त्यांचा अजूनही प्रवेश झालेला नाही. त्यांनी काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्‍त केल्यानंतर त्यांना कॉंग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु, कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी बरी म्हणत चंदनशिवे अद्याप तटस्थ भूमिकेत आहेत. कॉंग्रेसमधील पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीवर टीका करीत त्यांच्या पक्षातील नाराजांना फोडून आपल्याकडे आणा, अशी अपेक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे व्यक्‍त केली. मात्र, त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. काही दिवसांपूर्वी 'कॉंग्रस आपल्या दारी' ही मोहीम राबविली. मात्र, त्याचे नाव बदलून 'कॉंग्रेस मनामनात अन्‌ घराघरात' ही मोहीम हाती घेतली आहे.

praniti shinde
उस्मानाबादच्या खासदारांनी गाजवली सोलापूरची नियोजन बैठक!

खरटमलांनी अचानक झटका दिला

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि माजी महापौर नलिनी चंदेले यांनी कॉंग्रेसला हात दाखवून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर ते आमचे नव्हतेच, असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. मात्र, माजी महापौर चंदेले यांनी पक्षाचे काम सोडले होते, परंतु, खरटमल हे नेहमी आमच्यासोबत असायचे. ते पक्ष सोडतील असे वाटले नाही, त्यांनी अचानक झटका दिला, असे मत शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी व्यक्‍त केले. कोणीही पक्ष सोडून गेले, तरीही महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसच मोठा पक्ष राहील, असा दावाही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.