अक्‍कलकोट कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर! करमाळा, माढ्यातील रुग्ण घटले

1Corona_93_0.jpg
1Corona_93_0.jpg
Updated on
Summary

शहरात दहा रुग्णांची भर पडली आहे. अक्‍कलकोट तालुक्‍यात अवघे आठ रुग्ण उपचार घेत असून हा तालुका कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आहे.

सोलापूर: कोरोनाच्या दोन्ही लाटेत शहर- ग्रामीणमध्ये आतापर्यंत एक लाख 85 हजार 76 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक लाख 75 हजार 359 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. सध्या शहरातील 63 तर ग्रामीणमधील चार हजार 984 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. चिंतेची बाब म्हणजे ग्रामीणमध्ये आज 584 रुग्ण वाढले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात दहा रुग्णांची भर पडली आहे. अक्‍कलकोट तालुक्‍यात अवघे आठ रुग्ण उपचार घेत असून हा तालुका कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आहे.

1Corona_93_0.jpg
सावधान! सोलापूर जिल्हा बनतोय बिबट्यांचा अधिवास; जाणून घ्या कारणे

ग्रामीणमध्ये आज अक्‍कलकोट तालुक्‍यात एकही रुग्ण आढळला नाही. बार्शीत 48, करमाळ्यात 64, माढ्यात 84, माळशिरस तालुक्‍यात सर्वाधिक 141, मंगळवेढ्यात 21, मोहोळ तालुक्‍यात 35, उत्तर सोलापूर तालुक्‍यात तीन, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात पाच, पंढरपूर तालुक्‍यात 87 तर सांगोला तालुक्‍यात 96 रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत 23 लाख 47 हजार 290 संशयितांची कोरोना चाचणी झाली आहे. त्यात एक लाख 85 हजार 76 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात असून ग्रामीणमधील उत्तर, दक्षिण सोलापूर आणि अक्‍कलकोट तालुकेही कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल करीत आहेत. मात्र, ग्रामीणमधील मृत्यूदर चिंताजनक होऊ लागला आहे. त्यामुळे मृत्यूदर रोखण्याचे प्रमुख आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

1Corona_93_0.jpg
तुम्हाला लगेच नोकरी हवीय का? सोलापूर विद्यापीठात 114 कोर्सेस

अक्कलकोटमध्ये 14 दिवसांत 15 रुग्ण

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच ग्रामीणमधील माळशिरस, पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा या तालुक्‍यांमध्ये रुग्ण वाढत असल्याने त्याठिकाणी पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे अक्‍कलकोट, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे तीन तालुके कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आहेत. अक्‍कलकोट तालुक्‍यात मागील 14 दिवसांत अवघे 15 रुग्ण वाढले असून मागील तीन दिवसांत एकही रुग्ण वाढलेला नाही. सध्या उत्तर सोलापुरातील 26 तर दक्षिण सोलापुरातील 19 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हे रुग्ण बरे होऊन घरी गेल्यानंतर आणि तोवर या तालुक्‍यात एकही रुग्ण न आढळल्यास तिन्ही तालुके कोरोनामुक्‍त होतील, असा विश्‍वास आरोग्य विभागाने व्यक्‍त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.