'या' तालुक्‍यांतील कोरोना रुग्ण होईनात कमी! माढ्यात 15 रुग्ण गेले पळून

'या' तालुक्‍यांतील कोरोना रुग्ण होईनात कमी ! माढ्यात 15 रुग्ण गेले पळून
कोरोना चाचणी
कोरोना चाचणीEsakal
Updated on
Summary

करमाळा वगळता माळशिरस, पंढरपूर, सांगोला व माढा तालुक्‍यातील रुग्णवाढ कायम आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेतील विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी पाच तालुक्‍यांतील निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला. परंतु, करमाळा (Karmala) वगळता माळशिरस (Malshiras), पंढरपूर (Pandharpur), सांगोला (Sangola) व माढा (Madha) तालुक्‍यातील रुग्णवाढ कायम आहे. सोमवारी ग्रामीणमध्ये 556 तर शहरात दोन रुग्ण वाढले असून, ग्रामीणमधील सहा तर शहरातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, भोसरे (ता. माढा) येथे सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमधून (Covid Care Center) विविध गावांतील 15 कोरोना बाधितांनी मागच्या दाराने पलायन केले. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोना चाचणी
कॉंग्रेसचे वड्डेटीवार 'या' मागणीसाठी सोडणार मंत्रिपद !

ग्रामीणमध्ये सोमवारी अक्‍कलकोट तालुक्‍यात दोन, उत्तर सोलापुरात तीन, दक्षिण सोलापुरात चार, बार्शी तालुक्‍यात 27, मंगळवेढ्यात सात, मोहोळ तालुक्‍यात 22 रुग्ण वाढले आहेत. तसेच करमाळा तालुक्‍यात 58, माढा तालुक्‍यात 138, माळशिरस तालुक्‍यात 98 आणि पंढरपूर तालुक्‍यात 107 नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ग्रामीणमधील 19 लाख 32 हजार 432 संशयितांची तर शहरातील चार लाख 50 हजार 728 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात ग्रामीणमध्ये एक लाख 57 हजार 140 तर शहरात 29 हजार 76 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे शहरातील एक हजार 438 तर ग्रामीणमधील तीन हजार 246 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, ग्रामीणमधील एक लाख 48 हजार 825 तर शहरातील 27 हजार 586 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. आता शहरातील 52 तर ग्रामीणमधील पाच हजार 69 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी म्युकरमायकोसिसचा एक रुग्ण वाढला असून या आजाराची रुग्णसंख्या आता 648 झाली आहे. त्यापैकी 90 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 522 रुग्णांनी या आजारावर मात केली असून सध्या 36 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बेशिस्तांवर काटेकोर वॉच नाहीच

कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाच तालुक्‍यांतील निर्बंध कडक केले. त्यानंतर कोरोना चाचण्या वाढविल्या, परंतु बेशिस्तांवर वॉच ठेवण्यात प्रशासनाला म्हणावे तितके यश मिळालेले नाही. होम क्‍वारंटाईनमधील अनेकजण बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी वेगळी यंत्रणा अजूनही दिसत नाही. निर्बंध असतानाही घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे रुग्ण कमी होत नसल्याने आता प्रशासनाने बेशिस्तांवर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज व्यक्‍त होत आहे.

कोरोना चाचणी
श्रद्धेचे प्रतीक जेऊर येथील स्वयंभू श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिर

कोविड केअर सेंटरमधून 15 कोरोनाबाधितांनी केले पलायन

शासनाच्या वतीने भोसरे (ता. माढा) येथे सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमधून विविध गावांतील 15 कोरोना बाधितांनी मागच्या दाराने पलायन केले. आरोग्यसेवक दत्तात्रय मल्लिकार्जुन कांबळे (रा. भोसरे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिसांत या घटनेची नोंद सोमवारी रात्री उशिरा झाली. माढा तालुक्‍यातील कोरोना बाधितांना भोसरे येथील मंगल कार्यालयात सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून उपचार केले जातात. शुक्रवारी (ता. 13) संध्याकाळी ते सोमवारी (ता. 16) दुपारच्या दरम्यान या सेंटरमधून नाडी येथील तीन कोरोनाबाधित रुग्ण, बादलेवाडी येथील एक, पिंपळनेर येथील दोन, कुर्डू येथील एक, पिंपळखुंटे येथील दोन, पडसाळी येथील पाच, तडवळे येथील एक असे एकूण 15 जणांनी इतरांच्या जीवितास कोरोना रोगाचा संसर्ग होण्याचा संभव माहीत असताना देखील ते पळून गेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.