रूग्ण घटताहेत पण मृत्यूदराची चिंता! 'या' कारणामुळे वाढले मृत्यू

रूग्ण घटताहेत पण मृत्यूदराची चिंता! 'या' कारणामुळे वाढले मृत्यू
Updated on
Summary

प्रशासनासमोर कोरोनाच्या रूग्णांबरोबरच मृत्यूदर रोखण्याचे आव्हान आहे.

सोलापूर : शहर व ग्रामीणमधील रूग्णसंख्या मागील काही दिवसांच्या तुलनेत कमी झाली आहे. मात्र, मृत्यूदराची चिंता कायम असून मृत्यू रोखण्याचे प्रमुख आव्हान प्रशासनासमोर आहे. शहर-ग्रामीणमधील मृतांची संख्या आता चार हजारांहून अधिक झाली असून बुधवारी 27 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे मृत्यू झालेल्यांचे वय 50 पेक्षाही कमी होते. (the number of deaths due to corona is increasing in the city of solapur)

रूग्ण घटताहेत पण मृत्यूदराची चिंता! 'या' कारणामुळे वाढले मृत्यू
130 कोटींच्या घोळात थांबली 450 कोटींची सोलापूर-उजनी दुहेरी पाइपलाइन !

ग्रामीण भागात बुधवारी नऊ हजार 401 संशयितांमध्ये 608 जणांचे तर शहरात एक हजार 736 संशयितांमध्ये 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर ग्रामीणमधील 22 तर शहरातील पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ग्रामीण भागातील एक हजार 78 तर शहरातील 28 रूग्ण बरे होऊन घरी परतले. शहरात उच्चांकी मृत्यूदराची नोंद झाली. बुधवारी 20 टक्‍क्‍यांपर्यंत मृत्यूदर राहिला. शहरात 28 रूग्ण नव्याने वाढले तर पाच रूग्णांचा मृत्यू झाला. मागील महिनाभरात ग्रामीणमध्ये दररोज सरासरी 20 ते 24 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. रूग्णसंख्याही 500 पेक्षा कमी झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनासमोर कोरोनाच्या रूग्णांबरोबरच मृत्यूदर रोखण्याचे आव्हान आहे.

रूग्ण घटताहेत पण मृत्यूदराची चिंता! 'या' कारणामुळे वाढले मृत्यू
लसीसाठी सोलापूर वेटिंगवरच ! लसीअभावी 339 केंद्रे बंद

बुधवारी अक्‍कलकोटमध्ये 18 तर दक्षिण सोलापुरात नऊ रूग्ण वाढले आहेत. तसेच बार्शीत 85, माढ्यात 44 रूग्ण वाढले असून प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला आहे. करमाळ्यात 38, मंगळवेढ्यात आठ रूग्ण वाढले असून त्याठिकाणी प्रत्येकी एका रूग्णाचा कोरोनाने बळी घेतला आहे. चिंतेची बाब म्हणजे मोहोळ तालुक्‍यात 25 रूग्ण वाढले असून पाच रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. माळशिरस तालुक्‍यात 140 रूग्ण वाढले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापुरात दहा तर पंढरपुरात 175, सांगोल्यात 56 रूग्ण वाढले असून या तालुक्‍यातील प्रत्येकी दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अंगावर आजार काढणे, गावातच उपचार घेणे अशा प्रकारांमुळे मृत्यू वाढत असल्याचे चित्र आहे.

रूग्ण घटताहेत पण मृत्यूदराची चिंता! 'या' कारणामुळे वाढले मृत्यू
"उजनी"चे पाणी पेटणार, शेटफळ गढे योजनेला सोलापूर-नगरचा विरोध

शहर-ग्रामीणमधील रूग्णांची स्थिती

- एकूण रूग्ण : 1,52,751

- बरे झालेले रूग्ण : 1,43,516

- एकूण मृत्यू : 4,024

- उपचार घेणारे रूग्ण : 5,211

रूग्ण घटताहेत पण मृत्यूदराची चिंता! 'या' कारणामुळे वाढले मृत्यू
"उजनी'च्या पाण्यावरून पेटणार सोलापूर-इंदापूर नवा वाद?

म्युकरमायकोसिसचे 12 रूग्ण वाढले

शहर-जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रूग्ण वाढू लागले असून आज एकाच दिवशी 12 रूग्ण वाढले आहेत. आतापर्यंत 358 रूग्ण आढळले असून त्यापैकी 218 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. चिंतेची बाब म्हणजे एकूण रूग्णांपैकी 26 जणांचा या आजाराने बळी घेतला आहे. तर सद्यस्थितीत शहरातील 29 रूग्णालयात 218 रूग्ण उपचार घेत आहेत.

(the number of deaths due to corona is increasing in the city of solapur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.