नेत्यांसमोर आमदारकीचा पेच! कोठे, चंदनशिवे, बेरिया, तौफिक यांचा जूनमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश

महापालिकेत अनेकदा निवडून आल्यानंतर साहजिकच अनेकांना आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यात प्रामुख्याने महेश कोठे, तौफिक शेख, ॲड. यू. एन. बेरिया, आनंद चंदनशिवे यांचा समावेश आहे. या नेत्यांच्या मनातील इच्छा वर्षानुवर्षे एकाच पक्षात राहूनही अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ते आता राष्ट्रवादीतून नशीब आजमावणार आहेत.
कोठे, तौफिक शेख, चंदनशिवेंचे 'या'वेळी पक्षांतर! कॉंग्रेसचे माजी महापौरही अस्वस्थ
कोठे, तौफिक शेख, चंदनशिवेंचे 'या'वेळी पक्षांतर! कॉंग्रेसचे माजी महापौरही अस्वस्थesakal
Updated on

सोलापूर : महापालिकेत अनेकदा निवडून आल्यानंतर साहजिकच अनेकांना आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यात प्रामुख्याने महेश कोठे, तौफिक शेख, ॲड. यू. एन. बेरिया, आनंद चंदनशिवे यांचा समावेश आहे. या नेत्यांच्या मनातील इच्छा वर्षानुवर्षे एकाच पक्षात राहूनही अद्याप पूर्ण झालेली नाही.

त्यामुळे ते आता राष्ट्रवादीतून नशीब आजमावणार आहेत. मे अखेरीस किंवा १० जूनपूर्वी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याने निश्चितपणे त्याचा लाभ राष्ट्रवादीला होईल. मात्र, २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत याच इच्छुकांसमोर मतदारसंघाचा पेच असेल, अशी चर्चा आहे.

कोठे, तौफिक शेख, चंदनशिवेंचे 'या'वेळी पक्षांतर! कॉंग्रेसचे माजी महापौरही अस्वस्थ
महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

शहरात वर्षानुवर्षे काँग्रेसला साथ दिलेले महेश कोठे हे बाहेर पडले आणि काँग्रेसची पीछेहाट सुरू झाल्याचे बोलले गेले. शहरात विशेषत: शहर उत्तर, शहर मध्य व पूर्व भागात त्यांची मोठी ताकद आहे. महापालिकेत कधीच दुसऱ्या क्रमांकावर येऊ न शकलेली शिवसेना त्यांच्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर गेली. आता त्यांच्यासोबत समर्थक नगरसेवकदेखील पक्षांतर करतील, असा अंदाज असून, महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर झाल्यानंतर आपल्याला आमदारकी मिळेल, असा विश्वास कोठेंना आहे.

ते शहर उत्तरमधूनही निवडणूक लढवू शकतात, पण त्या ठिकाणी त्यांना राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असणाऱ्या आनंद चंदनशिवेंचा अडथळा राहणार आहे. त्यामुळे ते शहर उत्तर किंवा शहर मध्यमधून लढतील, की विधानपरिषदेवर त्यांना संधी मिळेल, हे आगामी काळच ठरवेल. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून तीनवेळा विजयकुमार देशमुख हे विजयी ठरले आहेत. दुसरीकडे, मुस्लिम समाजाचे सर्वाधिक प्राबल्य असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आमदारकीला सर्वाधिक संघर्ष पाहायला मिळेल.

ॲड. बेरिया, माजी नगरसेवक तौफिक शेख यांनाही याच मतदारसंघातून उमेदवारी हवी असल्याचे बोलले जात आहे. २०१४ च्या निवडणुकीत तौफिक शेख यांना चांगली मते मिळाली होती. पण, आता मुस्लिम नेत्यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्याबरोबरच फारुख शाब्दी यांचे कडवे आव्हान असेल. तरीही, हा मतदारसंघ आघाडीत काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादीत गेलेल्या मुस्लिम नेत्यांना त्या ठिकाणी संधी मिळेल का, हा देखील प्रश्न अनुत्तरितच आहे. तूर्तास, महापालिका निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या नेत्यांचा पेच राष्ट्रवादीचे नेते कसे सोडविणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

कोठे, तौफिक शेख, चंदनशिवेंचे 'या'वेळी पक्षांतर! कॉंग्रेसचे माजी महापौरही अस्वस्थ
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर लालपरी रुळावर! दीड महिन्यातच ५२१ कोटींची कमाई

कोठेंच्या मोबाईलवर ‘राष्ट्रवादी पुन्हा’!
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राजकीय हवा ओळखून माजी महापौर महेश कोठे यांनी शिवसेनेचा धनुष्य हाती घेतला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसला हात दाखवून त्याच हातात शिवबंधन बांधले. पण, आता शिवबंधन सोडून त्यांनी त्याच हातात घड्याळ घालण्याचा निश्‍चय केला आहे. महापालिकेची टर्म संपल्यानंतर त्यांचा व त्यांच्या समर्थक आठ ते दहा समर्थक नगरसेवकांचा पक्षप्रवेश होईल, असा अंदाज वर्तविला गेला. अजूनपर्यंत तसे काहीच न झाल्याने त्यांचा पक्षप्रवेश रखडणार, अशी चर्चा झाली. पण, त्यांनी स्वत:च्या मोबाईलची कॉलरटोन आता ‘राष्ट्रवादी पुन्हा’ ही करून त्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()