'वीज वितरण'चा शेतकऱ्यांना दणका! थकीत बिलासाठी तोडला शेतीपंपाचा वीजपुरवठा

"वीज वितरण'चा शेतकऱ्यांना दणका! थकीत बिलासाठी तोडला शेतीपंपाचा वीजपुरवठा
"वीज वितरण'चा शेतकऱ्यांना दणका! थकीत बिलासाठी तोडला शेतीपंपाचा वीजपुरवठा
"वीज वितरण'चा शेतकऱ्यांना दणका! थकीत बिलासाठी तोडला शेतीपंपाचा वीजपुरवठाCanva
Updated on
Summary

वीज वितरण कंपनीने ऐन कोरोना काळात शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे.

पंढरपूर (सोलापूर) : वीज वितरण कंपनीने (MSEDCL) ऐन कोरोना (Covid-19) काळात शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. थकीत वीजबिल वसुलीसाठी भंडीशेगाव उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या उपरी, भंडीशेगाव, सुपली, पळशी, पिराची कुरोली येथील शेती पंपाचा वीजपुरवठा (Power supply) तोडला आहे. वीज कंपनीच्या या तुघलकी कारवाईनंतर शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

"वीज वितरण'चा शेतकऱ्यांना दणका! थकीत बिलासाठी तोडला शेतीपंपाचा वीजपुरवठा
मंदिरे बंद ठेवण्यावरून फडणवीसांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा! म्हणाले...

वीज वितरण कंपनीने शेती पंपाच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे. पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना वसुलीसाठी मोठा झटका दिला आहे. थकीत वीजबिल वसुलीसाठी भंडीशेगाव उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या उपरी, भंडीशेगाव, सुपली, पळशी, पिराची कुरोली येथील जवळपास 500 हून अधिक डीपी बंद केले आहेत. त्यामुळे हजारो शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित केल्याने हातातोंडाशी आलेली शेतीपिके विजेअभावी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

"वीज वितरण'चा शेतकऱ्यांना दणका! थकीत बिलासाठी तोडला शेतीपंपाचा वीजपुरवठा
श्रावण विशेष : भाविकांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र नीलकंठेश्वर मंदिर

दीड - दोन वर्षांपासून राज्यभरात कोरोनाचे सावट आहे. यामुळे शेती मालाचे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असतानाच वीज वितरण कंपनीने थकीत वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा तोडला. वीज वितरण कंपनीच्या या कारवाईचा शेतकऱ्यांना मोठा फटाका बसला आहे. दोन महिन्यांपासून पंढरपूर तालुक्‍यात पावसाने पाठ फिरवली आहे. सध्या ऊस, केळी, मका यासह डाळिंब, द्राक्ष आदी पिके पाण्याअभावी थोडक्‍यात असतानाच वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा तोडल्याने शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत.

वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तत्काळ सुरू करावा; अन्यथा वीज वितरण कंपनीच्या तुघलकी कारवाई विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.