लॉकडाऊनच्या नावाखाली 32 रुपयांवरून 22 रुपयांवर आले दुधाचे दर

लॉकडाऊनच्या नावाखाली 32 रुपयांवरून 22 रुपयांवर आले दुधाचे दर
Milk
MilkCanva
Updated on

सलगर बुद्रूक (सोलापूर) : कोरोना (Covid-19) वाढला अन्‌ लॉकडाऊन (Lockdown) लागला. यात सर्वांत मोठा फटका बसला तो शेती व्यवसायाला. शेती मालाला तर कवडीची किंमत आली आहेच पण दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेला दुग्धव्यवसाय (Dairy business) शेवटच्या घटका मोजतोय. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 32 रुपयांपर्यंत गेलेल्या गाईच्या दुधाच्या दरात एका महिन्याच्या आत तब्बल 10 रुपयांची घसरण होऊन दूधदर 20 ते 22 रुपये प्रतिलिटर झाला आहे. एकीकडे कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही. शेतीमालाला चांगला भाव नाही. दुधातून दोन रुपये मिळतील म्हटलं तर त्यातूनही शेतकऱ्याच्या हातात काहीच उरत नाही. (The price of milk has come down from Rs 32 to Rs 22 under the name of lockdown)

Milk
जिल्ह्यातील 15 गावांना मिळेना सरपंच ! कोरोनाच्या संकटात गाव कारभाऱ्याची उणीव

पशुखाद्याच्या किमती वाढल्या.

एकीकडे दुधाच्या दरात मोठी घसरण झाली असताना मात्र जनावरांना देण्यात येणाऱ्या पशुखाद्याच्या दरात गेल्या महिनाभरात मोठी वाढ झाली आहे. दूध वाढीसाठी जनावरांना देण्यात येणाऱ्या गोळी पेंड, शेंगा पेंड, मका भरडा, गहू भुसा, सरकी पेंड आदी वेगवेगळ्या प्रकारच्या पशुखाद्यात दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दूध उत्पादनात घट होऊ नये व गाईला सकस आहार देणे गरजेचे असल्याने दूध उत्पादकांना पशुखाद्य खरेदी केल्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे एकीकडे दुधाच्या दरात घसरण व दुसरीकडे पशुखाद्याच्या दरातील भरमसाठ वाढ यामुळे शेतकरी भरडला जात असून दूध व्यवसाय आतबट्ट्यात आला आहे.

Milk
तरुण ठरताहेत कोरोनाचे बळी ! 17120 रुग्णांवर सुरू आहेत उपचार

प्रशासनाचे दुर्लक्ष

कोरोनाचा कहर मोठा असताना महाविकास आघाडी सरकारने दूध दरासंबंधी एक चकार शब्दही तोंडातून काढला नाही. शिवाय शेतकरी संघटनाही मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे राज्यातील खासगी तसेच सहकारी संघांनी (काही दूध संघ वगळता) कोरोना व लॉकडाऊनच्या नावाखाली दूध उत्पादकांची लूटमार सुरू केली आहे.

एफआरफीप्रमाणे कायदा हवा

दूध दराचा प्रश्न हा वर्षानुवर्षे चालत आला आहे. अनेक शेतकरी संघटना या दूध दरासाठी आंदोलन करून सत्तेत गेल्या; पण हा प्रश्न तसाच आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर साखर उद्योगासाठी जसा एफआरफी हा कायदा लागू केला तसा दूध उद्योगासाठी सुद्धा अशाच कायद्याची गरज आहे, असे मत जाणकार शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. त्याशिवाय दुधाचा प्रश्न सुटणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

लॉकडाऊनच्या नावाखाली दूध दरात मोठी घसरण झाली आहे. मात्र पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अशात दूध व्यवसाय परवडत नाही. जनावरे विकायची म्हटलं तरी बाजार बंद आहेत. त्यामुळे मायबाप सरकारने या प्रश्नी लक्ष घालून न्याय द्यावा.

- पांडुरंग पुकळे, दूध उत्पादक शेतकरी, सलगर बुद्रूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.