सोलापूर विमानतळापेक्षा माळढोकचे संवर्धन महत्त्वाचे

सोलापूर विमानतळापेक्षा माळढोकचे संवर्धन महत्त्वाचे
Updated on
Summary

सोलापूर परिसरात विमानतळ असताना माळढोकपेक्षा नवे विमानतळ महत्त्वाचे वाटत नाही, माळढोक नामशेष होत असल्याने त्याचे संवर्धन करणे आवश्‍यक असल्याचा निर्वाळाही या समितीने दिला आहे.

सोलापूर: बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्रस्तावित सोलापूर विमानतळासाठी आवश्‍यक असलेल्या वन विभागाच्या ३३.७२ हेक्‍टर राखीव वनजमिनीच्या निर्वनीकरणाचा प्रस्ताव वन खात्याच्या प्रादेशिक अधिकार समितीने (आरईसी-रिजनल ईम्पॉवर्ड कमिटी) फेटाळला आहे. सोलापूर परिसरात विमानतळ असताना माळढोकपेक्षा नवे विमानतळ महत्त्वाचे वाटत नाही, माळढोक नामशेष होत असल्याने त्याचे संवर्धन करणे आवश्‍यक असल्याचा निर्वाळाही या समितीने दिला आहे.

सोलापूर विमानतळापेक्षा माळढोकचे संवर्धन महत्त्वाचे
पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस 17 ऑक्टोबर पर्यंत रद्द

बोरामणी येथील प्रस्‍तावित सोलापूर विमानतळासाठी आवश्‍यक असलेल्या ५७३ हेक्‍टरचे भूसंपादन झाले आहे. आणखी ३३ हेक्‍टर जागा वन विभागाची आहे. या जागेच्या बदल्यात पर्यायी जागा देऊन येथील ३३ हेक्‍टरचे निर्वनीकरण करण्याचा जिल्हा प्रशासनाच्यावतीने या समितीसमोर ठेवण्यात आला होता. या समितीची बैठक २० ऑगस्टला झाली असून या बैठकीत हा निर्वनीकरणाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. त्याबाबतचे पत्र समितीचे तांत्रिक अधिकारी एन. के. दिमरी यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनसंवर्धन अधिनियमाच्या नोडल ऑफिसरला पाठविले आहे.

सोलापूर विमानतळापेक्षा माळढोकचे संवर्धन महत्त्वाचे
सोलापूर: भोगावती व नीलकंठा नदीतून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

जिल्ह्यातील घटत जाणाऱ्या माळरानांमुळे तसेच कृषी क्षेत्रातील वाढत्या किटकनाशकांच्या वापरामुळे माळढोक पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात आलेला आहे. देशात बोटावर मोजण्या इतक्‍याच संख्येने माळढोक शिल्लक आहेत. सध्या माळढोकच्या फक्त एका मादीचा रहिवास सोलापूर जिल्ह्यात आहे. बोरामणीतील प्रस्तावित सोलापूर विमानतळ झाल्यास माळढोकाचा अधिवास धोक्‍यात येऊ शकतो. सध्या एकाच मादीचा रहिवास असला तरी भविष्यात याची संख्या वाढू शकते. विमानतळासाठी अंत्यत दुर्मिळ असलेल्या व नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या देखण्या पक्ष्यांची प्रजात कायमची नष्ट होण्याऐवजी या विमानतळाचाच पुनर्विचार करावा, असे निर्देशही वन विभागाने दिले आहेत. महाराष्ट्राच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात बोरामणी येथील प्रस्‍तावित सोलापूर विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधीची तरतूद आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचा निधीही मिळाला आहे. निर्वनीकरणाचा प्रश्‍न अधिक जटिल झाल्याने या प्रस्तावित विमानतळाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.