एफआरपी व्याजासह द्या! प्रादेशिक सहसंचालकांचे कारखान्यांना आदेश

शेतकऱ्यांची एफआरपी व्याजासह द्या! प्रादेशिक सहसंचालकांचे कारखान्यांना आदेश
शेतकऱ्यांची एफआरपी व्याजासह द्या! प्रादेशिक सहसंचालकांचे कारखान्यांना आदेश
शेतकऱ्यांची एफआरपी व्याजासह द्या! प्रादेशिक सहसंचालकांचे कारखान्यांना आदेशCanva
Updated on
Summary

गाळप केलेल्या उसाचे वेळेवर पैसे न आल्याने शेतकऱ्यांची बाजारातील पत जवळ जवळ संपली आहे.

मोहोळ (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) ज्या खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी (Sugar Mills) शेतकऱ्यांची एफआरपीची (FRP) रक्कम अद्यापही त्यांना दिलेली नाही, ती तत्काळ व पंधरा टक्के व्याजासह शेतकऱ्यांना अदा करावी, असा लेखी आदेश प्रादेशिक सहसंचालक यांनी सर्व साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व जनरल मॅनेजर यांना दिला असल्याची माहिती जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी दिली. तशा आशयाचे लेखी पत्र देशमुख यांना प्राप्त झाले आहे. या निर्णयामुळे शेतकरी आनंदला आहे तर साखर कारखाना प्रशासनाची मोठी पंचाईत झाली आहे.

शेतकऱ्यांची एफआरपी व्याजासह द्या! प्रादेशिक सहसंचालकांचे कारखान्यांना आदेश
संचारबंदीच्या विरोधात पंढरपुरातील व्यापाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन !

यासंदर्भात देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी 2020-21 या गाळप हंगामातील शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाची एफआरपीची रक्कम अद्याप पावेतो शेतकऱ्यांना अदा केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाली आहे. गाळप केलेल्या उसाचे वेळेवर पैसे न आल्याने शेतकऱ्यांची बाजारातील पत जवळ जवळ संपली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात सध्या ऊस, भुईमूग, मका यासह डाळिंब, द्राक्ष, पेरू, सीताफळ, लिंबू आदींसह अन्य फळबागा उभ्या आहेत. शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे उसावर अवलंबून असते. मात्र गाळपास गेलेल्या उसाचे पैसे वेळेत न आल्याने शेतात उभ्या असलेल्या फळबागा व अन्य पिके कशी जोपासावीत, याची मोठी अडचण शेतकऱ्यांना झाली आहे.

शेतकऱ्यांची एफआरपी व्याजासह द्या! प्रादेशिक सहसंचालकांचे कारखान्यांना आदेश
'विठ्ठल, चंद्रभागा कारखान्याची मालमत्ता जप्त करा; अन्यथा आंदोलन !'

दरम्यान, शेतकऱ्यांच्या उसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावर देशमुख यांनी कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांची समाधी असलेल्या प्रीतिसंगम या ठिकाणी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा सहकारमंत्री, साखर आयुक्त, साखर संचालक, जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य विभागांना लेखी निवेदनाद्वारे दिला होता. आंदोलनाचा इशारा देताच सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने दखल घेऊन देशमुख यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील सर्व कारखाना प्रशासनाला पंधरा टक्के व्याजासह शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम त्वरित अदा करण्याची सूचना दिल्याचे लेखी पत्र देशमुख यांना प्राप्त झाले आहे.

दरम्यान, यापूर्वीही देशमुख यांनी एफआरपीची रक्कम त्वरित शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आंदोलने केली आहेत; मात्र त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. मात्र या वेळीही तीच परिस्थिती निर्माण झाली तर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून, याचिकेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे तयार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम अद्यापही दिली नाही, त्यांना 2021-22 या गाळप हंगामाचा गाळप परवाना देऊ नये, अशी मागणीही देशमुख यांनी निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.